प्रेयसीला घाबरवण्यासाठी आत्महत्येचे नाटक करणाऱ्या प्रियकराचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

42 वर्षीय मृताचे नाव राजा असे आहे. राजा तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी असून तो गायक म्हणून काम करत होता. तो एका म्युझिक बँडचा भाग होता आणि त्याच बँडमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे 'विवाहबाह्य संबंध' होते.


या घटनेच्या धक्कादायक व्हिडिओमध्ये मृत राजा तरुणीसोबत वाद घालताना दिसत आहे. वादानंतर, प्रेयसीला घाबरवण्यासाठी, त्याने आत्महत्या करायची असल्याचे सांगितले आणि तो घराच्या दुसऱ्या खोलीत गेला. त्याने आपला फोन तिथेच ठेवला आणि स्वतःला फासावर लटकले.


हे पाहून खोलीत असलेल्या मुलीला धक्का बसला आणि तिने मृत राजाच्या गळ्यात गुंडाळलेले कापड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे दुर्दैवाने राजाच्या गळ्याला फास बसला आणि फाशीने त्याचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राजाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी वेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. राजाच्या मागे त्याची पत्नी आणि 3 मुले आहेत