Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28 प्रति औंसवर पोहोचली आहे.


सोन्याचा आजचा दर काय? (Gold Rate Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 15 जानेवारी रोजी सोमवारी सोन्याचा दर स्थिर असून त्यात कोणताही बदल झाला नाहीये. भारतात 22 कॅरेट सोन्याचे दर 5,800 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,327 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. त्यामुळं आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करु शकता. चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे. राज्यात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 58,000 रुपये आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 47,450 रुपये प्रतितोळा आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,270 रुपये प्रतितोळा आहे. 


महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर 


- पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


- नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपुरात चांदीचा दर 76,500 रुपये किलो आहे.


- नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,500 रुपये प्रति किलो आहे.


देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा दर


- दिल्लीः दिल्लीत आज सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 63,420 इतका आहे.


- कोलकत्ताः कोलकत्तात सोन्याचा दर आज 63,270 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. 


- चेन्नईः चेन्नईत आज सोन्याचा दर 63,760 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे.