मुंबई : शेअर मार्केटमध्ये लाखो गुंतवणूकदार आपले कौशल्य पणाला लावून गुंतवणूकीतून नफा कमावत असतात. त्यासाठी संबधित स्टॉकचे कठोर संशोधन, अभ्यास आणि चालीचा अचुक वेध घ्यायचा असतो. त्यामुळे आम्ही तुमच्या पोर्टफोलियोला मजबूत बनवण्यासाठी मार्केट एक्स्पर्ट्सने सूचवलेले दमदार शेअर सूचवत असतो. आजही आम्ही असाच एक खास शेअर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट एक्स्पर्ट्स संदिप जैन यांनी Dalmia Bharat Sugar स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. दीर्घ किंवा कमी अवधीसाठी या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 


जैन यांनी म्हटले आहे की, Dalmia Bharat Sugar स्टॉक हा एक क्वॉलिटी शेअर आहे. कंपनीचा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात चांगला व्यापार आहे. सरकारचाही साखर उद्योगाला चांगला सपोर्ट मिळतो. साखर देशातील राजकीय आणि राष्ट्रीय कमोडिटी आहे. 


Dalmia Bharat Sugar Buy Call
CMP 441.75
Target 530/570
Duration 6-9 महिने


कंपनीचे निकाल
कंपनी गेल्या 3 वर्षापासून नफ्यात आहे. गेल्या जून तिमाहीमध्ये कंपनीला 126 कोटींचा नफा झाला होता. या वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीला 134 कोटींचा नफा झाला आहे.  कंपनीचे फंडामेंटल्सदेखील उत्तम आहेत.