Gold Price: सध्या लग्नसराईचे हंगाम सुरू होणार असून ठिकठिकाणी सोने आणि चांदी (gold silver price today) खरेदीसाठी लगबग वाढत आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेला एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. सोन्याचा भाव सराफ बाजारात वाढत आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर आधी तपासा मगच सोने-चांदी (gold silver price today) खरेदी करण्याचा विचार करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सोन्याचा भावामध्ये 700 रुपयांची वाढ नोंदवली गेली. इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वेबसाइटनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिले आहे. तर त्याआधी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला आहे. तर आज (3 फेब्रुवारी) सोन्याचे दर 60,610 रुपयांवर पोहचला आहे. 


वाचा: पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि शुभ, अशुभ योग 


दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल विचार केल्यास त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात तो 1 हजार 805 रुपयांनी वाढून 71 हजार 250 रुपये किलो झाला आहे. 1 फेब्रुवारीला हाच दर 69 हजार 445 हजार रुपये होता. आजचे  (3 फेब्रुवारी) दर पाहता किलोभर चांदीसाठी 74,700 रूपये मोजावे लागणार आहेत. 


अर्थसंकल्पानंतर का वाढले भाव…


अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20 टक्केवरून 25 टक्के आणि चांदीवर 7.5टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. केडिया ऍडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीत झालेली वाढ हे सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळेल. अजय केडिया म्हणाले की 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. 



गेल्या वर्षभरात सोने 20 टक्क्यांनी वाढले


एक वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आता 60 हजार 610 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 12,602 रुपयांनी (20टक्के) वाढली आहे.