Today Gold Silver Rate: सोने- चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. अशातच तुम्ही सोने चांदी (gold silver price) खरेदी करायला जाणार असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची असणार आहे. कारण मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून सोने-चांदीचे आजचे दर जाहीर करण्यात आले आहे. आज बुधवारी  उघडताच सोन्याच्या किंमती किंचित वाढ झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 8 महिन्यांसाठी वाढले आहेत. त्यामुळे डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम देखील दरवाढीवर दिसून येतोय. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 57,570  रुपयांवर व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 51,300 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 71,500 रूपयांनी वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दरही वाढल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. 


वाचा : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर  


सोन्याकडे अनेकजण आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील पाहतात. मात्र सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे गुंतवणुकीचा पर्याय देखील सध्या मागे राहिला आहे. मौल्यवान धातूंच्या किंमतीचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्ली आणि इतर अन्य ठिकाणीही काही अंशी सारख्याच दरात व्यवहार करतात. 


प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर


गुडरिटर्न्स वेबसाइटवर जाहीर केलेल्या किमतींनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, कटक, अमरावती, गुंटूर, नेल्लोर, काकीनाडा, अनंतपूर, वारंगल, खम्मम, बेरहामपूर, राउरकेला, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, कडप्पा, तिरुपती आणि तिरुपती 22 कॅरेट सोन्याचा दर 51,440 रुपये प्रति 10 ग्रॅममध्ये विकले जात आहे. तर दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड, गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा येथे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 51,590 रुपये आहे. चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, सेलम, वेल्लोर, त्रिची, तिरुनेलवेली, तिरुपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52,360 रुपये आहे. म्हैसूर, बेल्लारी, मंगलोर आणि सुरतमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 51,490 रुपये आहे. 


तर दुसरीकडे चांदीचे दर मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, जयपूर, लखनौ, पाटणा, चंदीगड, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, भिवंडी, कोल्हापूर, लातूर, अमरावती येथे चांदीचा दर 71,800 रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, त्रिची, तिरुपूर, तिरुपती, तिरुनेलवेली, सेलम, वेल्लोर, नेल्लोर, कटक, खम्मम, कडप्पा, काकीनाडा, बेरहमापूर, इरोड, राजकोट, राउरकेला, निजामाबाद, वारंगल, अनंतपूर आणि अमरावती येथे चांदीचा दर 73,700 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.