Gold-silver Price : येत्या काही दिवसात येणाऱ्या सणउत्सवासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. HDFC Securities च्या मते सोन्याचा भाव 389 रुपयांनी घसरून 51,995 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 52,384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय बाजारात (indian market) शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण (fall in gold price) झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 389 रुपयांनी घसरला असून जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून $1,753.97 प्रति औंस झाला.
 
 चांदीच्या दरात घसरण 


चांदीचा भाव आज 1,607 रुपयांनी घसरून 56,247 रुपये प्रति किलो झाला आहे. मागील व्यवहारात चांदी 57,854 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 19.23 डॉलर प्रति औंस होता. दरम्यान इंडिया बुलियन ज्वेलर्सच्या (India Bullion Jewellers) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची कमाल किंमत 51,868 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तो गुरुवारी 52,081 रुपयांवर बंद झाला. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर मेकिंग चार्ज देखील आकारला जातो. त्यामुळे सोन्याच्या किंमत जास्त आहे.


 सोने-चांदीचे दर असे जाणून घ्या 


IBJA सरकारी सुटी वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. जर तुम्ही वीकेंडला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मोबाईलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करावा लागेल आणि सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाईल. sa