Gold silver Price 2 Sep : भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) आज सोने-चांदीचे नवीन दर (New gold-silver rates) जाहीर झाले आहेत. सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने (Gold) खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी (Golden opportunity)आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घ्या आज काय आहे सोन्याचा नवा भाव


गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर आता गुड रिटर्न्सनुसार (Good returns) गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 500 रुपयांची घसरण झाली आहे. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव सराफा बाजारात (Bullion market) 51,270 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.


वाचा : सोने खरेदीदारांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण


सोने विक्रमी दरापेक्षा खूपच स्वस्त झाले


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये, सोन्याने 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.