Gold Silver Price : दिवाळीनंतर सोने चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver : दिवाळीच सोने- चांदी दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Gold Silver rates 31 october 2022 : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. सुरूवातीला सोन्याच्या (Gold Silver Rates ) दरात तेजी दिसून आली तर दिवसाअखेर सोने घसरल्याचेही दिसून आले. दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी घसरण दिसून येत आहे. सोन्या चांदीच्या (Gold Silver Rates Today) कालच्या दराच्या तुलने आजचे दर किंचित वाढ असल्याचे दिसून येते. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.
इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या (आयबीजे) वेबसाईटनुसार, आज सोमवारी (Gold Rates) सोन्याचे दर 22 कॅरेटसाठी 46,900 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेटसाठी 51,160 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या सोमवारी हे दर अंदाजे 50,444 रुपये प्रति तोळा असे होते. परिणामी गेल्या आठवड्याभरातील सोने दर वाढीचा आलेख पाहता त्यात अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोने दर
शहर | 22 कॅरेट | 24 कॅरेट(रु.प्रति तोळा ) |
मुंबई | 46750 | 51000 |
पुणे | 46780 | 51031 |
नवी दिल्ली | 46900 | 51160 |
कोलकाता | 46750 | 51000 |
बंगळूरु | 46800 | 51050 |
हैदराबाद | 46750 | 51000 |
केरळ | 46750 | 51050 |
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे चांदीचे दर
शहर | किंमत (रु.प्रति किलो) |
मुंबई | 57500 |
पुणे | 57500 |
नवी दिल्ली | 57500 |
कोलकाता | 57500 |
बंगळूरु | 57500 |
हैदराबाद | 63000 |
केरळ | 63000 |
बडोदा | 57500 |
चेन्नई | 63000 |