Petrol-Diesel Price Today 2nd November:  पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude oil price) दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.  आज जाहिर करण्यात आलेल्या तेलाची किमतीत वाढ झाली असून देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (petrol diesel price) गेल्या पाच महिन्यांपासून त्याच पातळीवर सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 पैशांनी कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. अशा परिस्थितीत तेलाच्या किमतीत (Petrol Diesel Rate) कोणताही बदल झालेला दिसत नाही. बुधवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.63 वर वाढलेले दिसले. ब्रेंट क्रूडही वाढले आणि ते प्रति बॅरल $ 94.79 वर पोहोचले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत. 


ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण झाली होती. मात्र त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नव्हता. तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.


वाचा : आज 'या' राशीसाठी लाभदायक दिवस,पाहा तुमची रास आहे का  


महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 


अहमदनगर - 106.53 रूपये - 93.15


अकोला - 106.14 रूपये - 92.69  


अमरावती - 107.44 रूपये - 93.94 


औरंगाबाद - 107.02 रूपये - 93.50 


भंडारा - 107.01 रूपये - 93.53  


बीड -  107.96 रूपये - 94.42  


बुलढाणा - 106.96 रूपये - 93.485 


चंद्रपूर - 106.96  रूपये - 92.68


धुळे - 106.13 रूपये - 92.66 


गडचिरोली - 106.92 रूपये - 93.45


गोंदिया -107.53  रूपये - 94.02 


बृहन्मुंबई - 106.49 रूपये - 94.4 


हिंगोली - 107.06 रूपये - 93.58


जळगाव - 106.42 रूपये - 92.94


जालना -107.91 रूपये - 94.36 


कोल्हापूर -107.45 रूपये - 93.94 


लातूर - 107.25  रूपये - 93.74 


मुंबई शहर - 106.31 रूपये - 94.27 


नागपूर - 106.04  रूपये - 92.59 


नांदेड - 107.84  रूपये - 94.78  


नंदुरबार - 107.22 रूपये - 93.71 


नाशिक - 106.51 रूपये - 93.02


उस्मानाबाद - 106.92 रूपये - 93.43 


पालघर - 105.94  रूपये - 92.44 


परभणी - 108.50 रूपये - 94.93  


पुणे - 106.22 रूपये - 92.73


रायगड - 105.77  रूपये - 92.28


रत्नागिरी - 107.65 रूपये - 94.14


सांगली - 106.05 रूपये - 92.60


सातारा - 106.76 रूपये  - 93.28


सिंधुदुर्ग - 107.97  रूपये - 94.45


सोलापूर - 106.77 रूपये - 93.29


ठाणे - 105.77 रूपये - 92.47 


वर्धा -106.53 रूपये - 92.06  


वाशिम - 106.95 रूपये - 93.47  


यवतमाळ -107.29 रूपये - 93.80    


सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज तेलाचे दर सोडतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यास, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.