Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठे बदल; झटपट चेक करा आजचे रेट
Petrol-Diesel Price Today: देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे देशभरात इंधन दरांत कपात होण्याची शक्यता आहे.
Petrol-Diesel Price Today 11 November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचवेळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही विशेष बदल झालेला नाही. आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय नोएडा-ग्रेटर नोएडासारख्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट झाली
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
दर दररोज संध्याकाळी 6 वाजता जाहीर केले जातात
तसेच पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (petrol latest price) दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
मे महिन्यात अखेरचे बदल
गेल्या अनेक दिवसांपासून देशात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होऊनही भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (maharashtra petrol diesel rate) कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल २२ मे रोजी झाला होता. अशा परिस्थितीत पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारने २२ मे रोजी उत्पादन शुल्क कमी करत देशभरातील नागरिकांना दिलासा दिला होता.
तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा
इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPRICE पाठवू शकतात. याशिवाय बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवू शकतात.