Petrol Diesel Rate Today : महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. त्यातच आता सणासुदीच्या काळातही तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. (Petrol-Diesel Rate Update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील तसेच महाराष्ट्रातील ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) पेट्रोल- डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता ( Petrol Diesel Rate Today ) तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर अपडेट केले जातात. 28 सप्टेंबरलाही ( Petrol Diesel Rate ) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. 


याचदरम्यान भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज (18 ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबई, बंगाल, तामिळनाडूसह देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel rate) दरात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर  अद्याप स्थिर आहेत. दरम्यान भारतीय कंपन्या आता रशिया-युक्रेन युद्धात झालेल्या नुकसानीतून नफा कमावत आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता कायम आहे.


इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अपडेटनुसार दिल्ली-एनसीआर विभागातील नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये आहे. त्याच वेळी, चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.


दिल्ली, मुंबई, कोलकाता पेट्रोलचे दर किती?


दिल्लीत (delhi petol price) पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


 वाचा : पाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं 


SMS द्वारे तपासा लेटेस्ट दर 


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर 


शहर  पेट्रोल रु/लिट  डिझेल रु/लि
दिल्ली  96.72  89.62
मुंबई  106.31  94.27
कोलकाता  106.03  92.76
चेन्नई  102.63  94.24
गुरुग्राम  97.18  90.05
जयपूर  108.48  93.72
भोपाळ  108.65  93.90
पाटणा  107.24  94.02
लखनौ  96.57  89.76
रांची  99.84  94.65

राज्य स्तरावर पेट्रोल उत्पादनांवर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरही वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेव्हापासून आजतागायत राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ किंवा कपात झालेली नाही.