सोन्याच्या किंमतीत घट, चांदीचे दर वाढले
जागतिक बाजारपेठेतील मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
नवी दिल्ली : दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किंमती कितीही वाढल्या तरीही सोन्या-चांदीच्या किंमतीबद्दल प्रत्येकालाच अप्रूप असतं. आपल्या संस्कृतीत सोन्याला फार महत्व दिले जाते. त्यामुळे सोने खरेदीकडे सर्वांचाच कल जास्त असतो. पेट्रोल डिझेलचे वाढते दर ज्याप्रमाणे संताप आणतात त्याप्रमाणे सोन्या चांदीचे दर वाढल्यावरही ग्राहकांना संताप येतो. पण आज चांदीने थोडीफार निराशा केली असली तरीही सोने खरेदी करांसाठी दिलासादायक बातमी आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. दुसरीकडे चांदीची किंमत वेगाने वाढली. दिल्ली सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव 115 रुपयांनी कमी होऊन 33 हजार 210 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीचा भाव 310 रुपयांनी वाढून 40 हजार 160 रुपये झाला. चांदीमध्ये नाणे निर्माता आणि औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर घडलेल्या आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या किंमती घसरल्याचे ट्रेडर्स सांगत आहेत.
सोन्याच्या किंमती
जागतिक स्तरावर सोन्याचा भाव 0.11 टक्के कमी होऊन 1284.3 डॉलर प्रति औंस झाले. तर चांदीचा भाव 0.16 टक्क्यांनी कमी होऊन न्यूयॉर्कमध्ये 15.43 औंस झाले. दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 115-115 रुपयांनी कमी होऊन 33 हजार 210 रुपये आणि 33 हजार 060 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 125 रुपयांनी वाढल्या.
चांदीच्या किंमती
8 ग्रॅमच्या सोन्याची किंमत गिन्नी भावानुसार 25 हजार 500 रुपयांवर स्थिर राहीली. चांदीची सध्याची किंमत 310 रुपयांनी वाढून 40 हजार 160 रुपये प्रति किलो आणि साप्ताहिक डिलीव्हरी वाल्या चांदीची किंमत 311 रुपयांनी वाढली. चांदीच्या नाण्याचे भाव स्थिर राहीले आहेत. त्यामुळे आजच सोने चांदी खरेदी करण्यास गेलेल्यांना चांदीसाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतील तर सोने खरेदीकरांच्या पैशांची थोडी बचतही होईल.