Stock watch today : महाशिवरात्रीच्या एका दिवसाच्या आरामानंतर शेयर मार्केट आज पुन्हा भरारी घेण्यास सज्ज आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेंडर्ससाठी आज कोणकोणत्या शेअर्समध्ये कमाईची संधी आहे. ते पाहूया! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


TATA MOTORS :  कोरोना काळातील घसरणीनंतर आता कंपनीला चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.  टाटा देशातील सर्वात मोठी मालवाहू ट्रक बनवणारी कंपनी आहे. त्यामुळे टाटा कंपनीच्या महसूलात वाढ होण्याची शक्यता कंपनीच्या वरिष्ठांनी  व्यक्त केली आहे.


HPCL: ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने आपले पहिले Electric Vehicle charger सुरू केले आहे. चार्जग्रिड  ChargeGrid Flare या कंपनीसोबत हिंदुस्थान पेट्रोलिएमने (HPCL) भागिदारी केली आहे.


Infosys : प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फॉसिसने जगातील सर्वात मोठी सोने उत्खनन कंपनी Newmont Corporation सोबत भागिदारी केली  आहे. 


IDBI Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्जवाटप करणाऱ्या चांगल्या बँकांच्या रॅंकिंगमध्ये आयडीबीआय बँकेला स्थान मिळाले आहे.


Happiest Minds Technologies Ltd: या आयटी  कंपनीने Ilantus Technologie या कंपनीसोबत  सुरक्षा संदर्भात भागिदारी केली आहे. त्यामुळे कंपनीच्या महसूलात वाढ होण्याची शक्यता आहे.