Boy Died After Toffee Stuck In His Throat: न कळत्या वयात असलेल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. मुलं खेळत असताना मोठ्यांच्या नकळत तोंडात एखादी वस्तू घालतात आणि अशावेळी अनर्थ होऊ शकतो. अशीच एक हादरवून टाकणारी घटना दिल्लीत समोर आली आहे. घशात चॉकलेट अडकल्याने चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सानियाल असं या मुलाचं नाव आहे.  आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या लाडक्या लेकावर ओढावलेला प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांचेही डोळे पाणावले होते. (Toffee Gets Stuck In 4 Years Old Boy Throat)


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सानियाल त्याच्या आजोबांसह घराबाहेर फेरफटका मारायला निघाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या आजोबांकडे चॉकलेटचा हट्ट धरला. आजोबांनीही लाडक्या नातवाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याला चॉकलेट घेण्यासाठी पैसे दिले. सानियाल आजोबांनी दिलेले पैसे घेऊन चॉकलेट घेऊन आला मात्र हेच चॉकलेट त्याच्या जीवावर बेतेल याची त्याला तिळमात्रही कल्पना नव्हती. 


२ हजारांची नोट बदली करण्याच्या नादात तुम्हाला खोट्या नोटा तर नाही मिळाल्या?; अशा ओळखा बनावट नोटा 


घरी जाताच चॉकलेट खाल्लं


सानियाल आजाबांसोबत घरी आल्यानंतर त्याने चॉकलेट फोडून खाल्लं. मात्र, ते चॉकलेट त्याच्या घशातच अडकले त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची अवस्था पाहून त्याचे आई- वडिलांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. 


मुलाला श्वास घेण्यास त्रास


मुलाला श्वास घेण्यात त्रास होत होता. तसंच, त्याला बोलताही येत नव्हते. डोळ्यातून अश्रू वाहत होते तर वेदनांनी त्याचा एवढुसा जीव हैराण होत होता. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र उपचार सुरू असतानाच सानियालचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


 रेल्वे कर्मचाऱ्याने लग्नाच्या 5 महिन्यांतच आई आणि पत्नीला संपवलं; कारण वाचून उडेल थरकाप


 


आई- वडिलांच्या डोळ्यांदेखत मृत्यू


सानियालचा आक्रोश पाहून त्याच्या आई-वडिलांचा हृदय पिळवटून निघाले होते. डॉक्टरांनी उपचारही वेळेत सुरू केले. मात्र इतके प्रयत्न करुनही सानियाचा जीव वाचू शकला नाही. आई-वडिलांच्या डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाला. सानियालच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याचे वडील धाय मोकलून  रडू लागले. तर, आईला मोठा धक्का बसला होता. सानियाल एकुलता एक मुलगा होता. त्यामुळं त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.


सानियाला आमचा एकुलता एक लेक होता. अशाप्रकारे आणि इतक्या लहान वयात त्याच्या नशीबात असा मृत्यू असेल, याची आम्ही कल्पनादेखील केली नव्हती, अशी भावना सानियालचे वडिल शाहरुख यांनी व्यक्ती केली आहे. शोकाकुल वातावरणात सानियालवर अत्यंविधी करण्यात आले.