Toilet Flush मध्ये दोन वेगवेगळे बटण का असतात? जाणून घ्या कारण
त्यांपैकी अस देखील फ्लश पाहायला मिळतं, जे दोन भागात विभागलं गेलं आहे.
मुंबई : आपल्या दैनंदिन कामांशी टॉयलेटचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणूनच ते आपल्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. ते आपल्या घरी, कामाच्या ठिकाणी तसचे बाहेर रस्त्यावर देखील असलेले पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी याची रचना किंवा त्याचा वापर वेगळा असतो. अशा स्थितीत तुम्ही तेथे बसवलेले अनेक प्रकारचे फ्लश पाहिले आणि वापरले असतील.
त्यांपैकी अस देखील फ्लश पाहायला मिळतं, जे दोन भागात विभागलं गेलं आहे. हे बटण लहान आणि मोठं आशा दोन वेगवेगळ्या आकारात येतात. परंतु असं का? याचा असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
चला या मागचं कारण जाणून घेऊ
यामागची संकल्पना पाणी वाचवण्याची आहे...
वास्तविक, आधुनिक टॉयलेटमध्ये दोन प्रकारचे लीव्हर किंवा बटण असतात आणि दोन्ही बटणे एक्झिट व्हॉल्व्हला जोडलेली असतात. मोठे बटण दाबल्याने सुमारे 6 लिटर पाणी बाहेर येते, तर लहान बटण दाबल्याने 3 ते 4.5 लिटर पाणी बाहेर पडते. आता जाणून घेऊया अशा प्रकारे किती पाण्याची बचत होते?
एका वर्षात मोठी बचत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंगचा अवलंब केल्यास वर्षभरात सुमारे 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. जरी त्याची स्थापना सामान्य फ्लशपेक्षा थोडी महाग असू शकते, परंतु यामुळे, तुमचं पाणी वाचणार हे नक्की.
1976 मध्ये व्हिक्टर पेपनेक यांनी त्यांच्या 'डिझाइन फॉर द रियल वर्ल्ड' या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. इंटरनेटवरील अनेक व्हिडिओंच्या मदतीने तुम्ही या डबल बटण प्रणालीचे फायदे स्वतः शोधू शकता.