तुम्ही अनेकदा मॉलच्या (Mall) टॉयलेटमध्ये (toilet) पाहिलं असेलच. टॉयलेटला लागून असलेली भिंत किंवा दरवाजा हा जमिनीपासून थोडा वर आलेला असतो. त्यामागील कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या वैशिष्ट्यांचा काही ना काही उद्देश असतो. अशाचप्रकारे मॉलमधील टॉयलेटचे (toilet) दरवाजे (Door) जमिनीपासून वर का असतात या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉयलेटचे दरवाजे वरच्या बाजूस असल्यास, साफसफाई करताना दरवाजा न उघडता पुसणे सोपे होते आणि त्या वेळेस कोणताही अडथळा येत नाही. तसेच यामुळे लोकांना अशा गोष्टी करण्यापासून रोखता येते, ज्या सार्वजनिक ठिकाणी करू नयेत. यामध्ये जोडप्यांमधील जवळीक, तोडफोड, मादक पदार्थांचा सेवन इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.


तसेच टॉयलेटमध्ये जाताना कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर अशावेळी नक्कीच कोणाच्या तरी ते लक्षात येऊ शकते. दरवाजा पूर्णपणे खाली येत नसल्याने दुसऱ्या बाजूने कोणत्याही व्यक्तीला बाहेर काढता येते.


यामागची दुसरी बाजू अशी की, त्यांची किंमत सामान्य दरवाज्यांपेक्षा कमी असते. तसेच त्यांना जास्त देखभालीची गरज लागत नाही. याशिवाय अनेकजण बाहेरून दरवाजा ठोठावत नाही, कारण त्यांना आत कोणी आहे हे कळू शकतं. त्यामुळे दारं वर असणं ही काही समस्या नाही. तसेच, जर तुम्ही चुकून दरवाजा लॉक केला असेल, तर तुम्ही बाजूच्या दारातूनही बाहेर पडू शकता.