बर्दाश्त किया है, अब बरबाद करेंगे, भाजपचे साडे तीन नेते कोठडीत असतील - संजय राऊत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. त्याच कोठडीत भाजपचे साडे तीन नेते असतील.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जीवावर आम्हाला धमक्या देत आहात. मात्र, महाराष्ट्रात सरकार आहे हे लक्षात घ्या. ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे. तुम्हाला ''बर्दाश्त किया है, अब बरबाद करेंगे'' असा खणखणीत इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिलाय.
महाराष्ट्रातील भाजप नेते आज हे मंत्री जातील, ते मंत्री जातील अशा धमक्या देत आहेत. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. त्याच कोठडीत भाजपचे साडे तीन नेते असतील.
भाजपच्या त्या साडे तीन नेत्यांच्या कोठडीत राहण्याची व्यवस्था होत आहे. 'हमाम मै सब नंगे होते है' हे भाजपने लक्षात घ्यावं. शिवसेना पक्षाची उद्या सायंकाळी शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार असून यावेळी सर्व पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.