अहमदाबाद : देशभर विविध रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. विविध रंगात तरुणाई, लहान थोर रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र अहमदाबादमध्ये अनोख्या पद्धतीने होळीचे सेलिब्रेशन करण्यात आलं. 


टोमॅटो होळी साजरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये टोमॅटो होळी साजरी करण्यात आली. एकमेकांवर टोमॅटो मारत इथं तरुणाईनं अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. याशिवाय रेन डान्सचाही तरुणांईने आनंद लुटला. अशाप्रकारे टोमॅटोनं होळी खेळण्याची प्रथा स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 



स्पेनमध्ये खास टोमॅटिनो फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येते. यांत ४० हजाराहून अधिक तरुणाई सहभागी होते. याच टोमॅटिनो फेस्टिव्हलची झलक होळीच्या निमित्ताने अहमदाबादमध्येही पाहायला मिळाली. 


परदेशी पाहुण्यांची होळी


धुळवडीचा उत्साह अगदी परदेशी पाहुण्यांमध्येही पाहायला मिळाला. इन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी आलेल्या चीनहून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांनीही मनमुराद होळीचा आनंद लुटला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये आलेल्या या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आनंद लुटत गुलालाची उधळण करत रंगपंचमी खेळली