मुंबई : बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता पंतप्रधान दुसर्‍यांदा बिहारमध्ये दौर्‍यासाठी येणार आहेत. गांधीजींची कर्मभूमी असलेल्या चंपारणपासून स्वच्छता मोहिमेला त्यांनी सुरूवात केली आहे. पंतप्रधान मोतिहारीमध्ये आयोजित 'सत्याग्रह ते स्व्च्छाग्रह' या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्यात 'स्वच्छ भारत अभियाना'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि ही मोहिम अधिक सफल करण्यासाठी ते जनतेला आवाहन करणार आहेत. 


खास सुरक्षा व्यवस्था  


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पटनामधील मोतिहारी पासून चाक चौबंद चौकसी दरम्यान खास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोतिहारीत 3 अतिरिक्त एसपी,तीन डीएसपी तैनात आहेत. 3500 लाठीधारी जवानांसोबत बिहार मिलिट्री पोलिस, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे सुरक्षा जवान असणार.  


ए पॉजिटिव्ह रक्तगटाचे जवान  


नरेंद्र मोदींचा रक्तगट ए पॉजिटीव्ह असल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही ए पॉजिटीव्ह रक्तगट असणार्‍या जवानांचाच समावेश करण्यात आला आहे. या परिसरातील हॉस्पिटलमध्येही त्याच्या व्यवस्थेचे आदेश देण्यात आले आहेत.