या `3` म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक फायदेशीर
अनेक जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
मुंबई : अनेक जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेअर बाजारातही मोठ्या घडामोडी दिसून येत आहेत. शेअर बाजार नवनवे उच्चांक स्थापन होत असले तरीही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणार्या अनेक कंपन्या फायद्यामध्ये आहेत.
एचडीएफसी, आर्इसीआर्इसीआर्इ, आदित्य बिर्ला आणि एसबीआय सारख्या अनेक लार्ज कॅप स्कीममधील कंपन्यांनी जानेवरी महिन्याच्या उच्चांकही अजून पार केला नाही. मात्र अनेक लहान फंड हाऊसमधील स्मार्ट मॅनेजर्स फायदा कमवत आहेत.
पहा कोणाकोणाला होतोय म्युचल फंडमध्ये फायदा ?
1. एक्सिस फोकस्ड 25 फंड
एका महिन्यात 5%, तीन महिन्यात 6% आणि वर्षाभरात 22% रिटर्न्सचा फायदा मिळवला आहे.
एयूएम : 4,217 करोड़ रुपये
टॉप 3 होल्डिंग्स : कोटक महिंद्रा बैंक, एचडीएफसी बैंक, टीसीएसचे शेअर्स पोर्टफोलियोमध्ये आहेत.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, स्किमचे फंड मॅनेजर कंपन्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करत आहेत. ज्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग अधिक आहे त्यांच्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. रिटर्न वाढवण्यासाठी आयपीओवर लक्ष देणं गरजेचे आहे.
बजाज फायनांस, एंड्योरेंस टेक्नोलॉजीज, बंधन बॅंक, गृह फायनांस आणि कोटक महिंद्रा बॅंकच्या स्कीम्सचं प्रदर्शन मजबूत करण्यासाठी मदत करत आहे.
2. पराग पारेख लॉन्ग टर्म फंड
महिन्याभरात 4%, तीन महिन्यात 8.75% आणि वर्षभरात 19% रिटर्न्सचा फायदा मिळतो.
एयूएम: 1,107 करोड़ रुपये
टॉप 3 होल्डिंग्स: अल्फाबेट इंक, एचडीएफसी बॅंक, बजाज होल्डिंग्सचे शेअर या पोर्टफोलियोमध्ये आहेत.
तज्ञांच्या माहितीनुसार, या फंडचे एक खास आकर्षण आहे. यांनी त्यांच्या एसेटचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लावला आहे. सध्या फंडच्या पोर्टफोलियोचे 28.1% अल्फाबेट इंक, फेसबुक, सुजुकी मोटर कॉर्प, नेस्ले, 3एम अशा कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले आहे.
3.एडलवाइस लार्जकॅप फंड
एका महिन्यात 4%, तीन महिन्यात 5% आणि वर्षभरामध्ये 15% रिटर्न्सचा फायदा होतो.
एयूएम: 133 करोड़ रुपये
टॉप 3 होल्डिंग्स : एचडीएफसी बॅंक, रिलायंस इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बॅंकचे शेअर्स पोर्टफोलियोमध्ये आहेत.
तज्ञांच्या माहितीनुसार, मागील वर्षभरात बेंचमार्कच्या तुलनेत यांनी अधिक रिटर्न्स दिले आहेत. लार्ज कॅप फंड कॅटेगरीमध्ये या फंडचा एक्सपेंस रेशो सर्वाधिक आहे. रिलायंस, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, टीसीएस आणि इंफोसिस अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या कंपनीला फायदा होत आहे.