Top 5 Small Cap Funds: तीन वर्षात तिप्पट कमाई! SIP मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सुवर्णसंधी
Top 5 Small Cap Funds: आपल्याला आपल्या पगारातून काही थोडीफार किंमत बाजूला ठेवून ती योग्य प्रकारे आपल्या महिन्याच्या बचतीत (How to save money from your salary) कशी जाईल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपणही समजा आपला दहा हजार रूपये पगार असेल तर त्यातील तीन हजार रूपये तरी सेव्हिंग अकांऊटमध्ये (Savings Account) टाकायचा प्रयत्न करतो.
Top 5 Small Cap Funds: सध्या सेव्हिंग्स (Savings) हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पगारातून काही थोडीफार किंमत बाजूला ठेवून ती योग्य प्रकारे आपल्या महिन्याच्या बचतीत (How to save money from your salary) कशी जाईल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपणही समजा आपला दहा हजार रूपये पगार असेल तर त्यातील तीन हजार रूपये तरी सेव्हिंग अकांऊटमध्ये (Savings Account) टाकायचा प्रयत्न करतो. यामुळे आपल्यालाही आपल्या दीर्घ कालीन भविष्याची (Future) चिंता नसते. आजकाल आपल्या सर्वांच्याच गरजा फार वाढत जात असून आपल्याला हातात पैसेही (Money) फार कमी येत आहे. त्यामुळे आपल्याला आता असा विचार करावा लागतो की आपण सेव्हिंग्स (Savings) करतानाही आपल्या पगारातील किती पैसे सेव्ह (Save) करू शकतो आणि जरी आपण दहा हजार रूपयांतून तीन हजार रूपये ठेवले की चार हजार रूपये तरी आपल्याला त्यातून येणारे रिटर्न्स किती मिळतील याचा विचार आपल्याला करावा लागतो. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही अशा कोणत्या गोष्टीत पैसे गुंतवू (Investment) शकता ज्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स येतील. (Top 5 Small Cap Funds you may get triple wealth in 3 Years from SIP see returns)
आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मॉल कॅप फंडमध्ये जाणार आहोत ज्यात तुम्ही चांगल्या तऱ्हेने इन्व्हेस्टमेंट (Investment) करू शकता आणि ज्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्सही मिळतील. म्युच्युअल फंड (Mutual Funds) कंपन्यांच्याच विविध श्रेणी आहेत. ज्यात अनेक योजना (Schemes) उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी (Equity), डेब्ट (Debt), हायब्रीड (Hybrid) अशा योजनांचा समावेश आहे. या योजनांमधून तुम्हाला परतावेही वेगवेगळे मिळतील. या वेगवेगळ्या योजनांमध्ये अशी एक श्रेणी आहे ज्यात तुम्हाला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड (Small Cap Mutual Fund) योजना मिळेल. इक्विटी म्युच्युअल फंड या श्रेणीतील अनेक योजनांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या 3 महिन्यांतील जर आपण आकडेवारी पाहिली तर स्मॉल कॅप फंडमधून 1,582 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या आम्ही तुम्हाला ज्या म्युच्युअल फंडांबद्दल बोलणार आहोत त्यांनी तीन वर्षात तिप्पट कमाई मिळवून दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात चाललंय काय? नातेवाईकच ठरतायत भक्षक; पोटच्या पोरीसोबतच त्या तिघांनी...
क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
Quant Small Cap Fund ने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 52.07% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वीची किंमत - 1 लाख रूपये
आताची किंमत - 3.40 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5,000 रुपये
किमान एसआयपी - 1000 रूपये
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड (Bank of India Small Cap Fund)
Bank of India Small Cap Fund गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 40.35% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वीची किंमत - 1 लाख रूपये
आताची किंमत - 2.76 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5,000 रुपये
किमान एसआयपी - 1000 रूपये
हेही वाचा - Junk Food करतंय तुमच्या मुलांचे दात खराब? 'ही' बातमी वाचा
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड (Canara Robeco Small Cap Fund)
Canara Robeco Small Cap Fund ने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 40.12% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वीची किंमत - 1 लाख रूपये
आताची किंमत - 2.75 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5,000 रुपये
किमान एसआयपी - 1000 रूपये
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
Nippon India Small Cap Fund ने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 35.38% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वीची किंमत - 1 लाख रूपये
आताची किंमत - 2.48 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5,000 रुपये
किमान एसआयपी - 1000 रूपये
कोटक स्मॉल कॅप फंड (Kotak Small Cap Fund)
Kotak Small Cap Fund ने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 33.53% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वीची किंमत - 1 लाख रूपये
आताची किंमत - 2.49 लाख रुपये
किमान गुंतवणूक - 5,000 रुपये
किमान एसआयपी - 1000 रूपये
(Source: मूल्य संशोधन, NAV: 17 नोव्हेंबर 2022)
(Discialmer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणतेही गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तुमचे स्वतःचे संशोधन करा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)