मुंबई : प्रत्येक माणसाची इच्छा असते की एक ना एक दिवस तो परदेश यात्रा करेल. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांना आड येतं ते बजेट. बजेटमध्ये बसणारी फॉरेन टूर कोणतीही टूर कंपनी देत नाही. त्यामुळे तुम्ही कमी पैशात भरपूर परदेश दौरे करू इच्छिता तर हे आर्टिकल नक्की वाचा. आम्ही तुम्हाला अगदी कमी दरात फॉरेन टूर प्लान सांगणार आहोत. भारत दौरा करण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढ्याच पैशात तुम्ही परदेश दौरा करू शकता. तर चला जाणून घेऊया फॉरेन टूर बद्दल 



१) कोस्टा रिका 


फॉरेन ट्रिपसाठी सर्वात स्वस्त आणि सुंदर ऑप्शन शोधत असाल तर मध्य अमेरिकेतील कॅरिबिआयातील कोस्टा रिका हे उत्तम ऑपशन आहे. २०१६ च्या परदेश दौऱ्याच्या यादीत उत्तम फॉरेन प्लेस म्हणून या शहराची नोंद आहे. या ठिकाणी भारतीय रुपयांचा एक्सचेंज दर अतिशय चांगला आहे.यामुळे तुम्ही सर्वाधिक जागा फिरू शकता. इथे तुम्ही स्नॉर्कलिंग, सर्फिंग, जेट स्कीइंग, राफ्टिंग सारखे अॅडवेंचर स्पोर्टस देखील करू शकता. हा परिसर इतका निसर्गाने नटला आहे की तुमचा स्ट्रेस निघून जाईल. 



२) झिम्बाब्वे 


जर तुम्ही नेचर लवर असाल आणि भारता बाहेरचा निसर्ग अनुभवू इच्छिता तर झिम्बाब्वेची टूर प्लान नक्की करा. इथे तुम्ही फेमस विक्टोरिया फॉल्स, माटोपोस नेशनल पार्क, मुटारे टाऊन, चिनोइई गुंफा आणि इतर टूरिस्ट स्पॉट फिरू शकता. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला बजेट हलवावा लागणार नाही. तुमचा खर्च अगदी आटोक्यातच येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही भारतातील इतर हिल स्टेशन फिरू शकता. 



३) श्रीलंका 


श्रीलंका हा देश भारतापासून जवळ देखील आहे आणि अगदी पॉकेट फ्रेंडली देखील आहे. इथे फिरणं हे भारतीयांच्या अगदी बजेटमध्ये असून भरपूर स्वस्त आहे. त्यामुळे या देशात फिरणारे लोक जास्त करून भारतातीलच असतात. जर तुम्ही मे किंवा जूनमध्ये बुकिंग करता तर तुम्ही एअर फेअर देखील स्वस्तात मिळेल. आणि जे तुम्हाला अधिक पैसे देतील. 



४) इंडोनेशिया 


नैसर्गिक सुंदरता, टूरिस्ट फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली असं हे इंडोनेशिया. इंडोनेशियाला भारतीय पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे. इथे देखील तुम्हाला भारतीय रुपयांचे चांगले एक्सचेंज रेट मिळू शकतो. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळेल. जर तुम्ही बालीला जाणं पसंद करत असाल तर तुम्हाला टूरिस्ट म्हणून उत्तम ट्रिटमेंट आणि फॅसिलिटी मिळू शकेल. 



५) इजिप्त 


मिस्र आणि इजिप्त देखील भारतीयांच्या हिशोबाने बघायचं तर उत्तम ऑप्शन आहे. जर तुम्ही इजिप्तला जाण्याचं तिकीट ५ ते ६ महिने अगोदर बुक केलं तर तुम्हाला ते कमी दरात मिळेल. आणि दुसरी बाब म्हणजे अगदी ५० हजारात तुम्ही टूरिस्ट स्पॉट फिरून येऊ शकता. तसेच इथे थांबण्यासाठी देखील तुम्हाला अधिक वाच बघावी लागणार नाही. पर्यटकांच्या तुलनेत पाहिलं तर इथे राहणं देखील अधिक स्वस्त आहे. तुम्हाला इथे चक्क ४०० रुपये दरात हॉटेल रूम मिळू शकतात. 



६)भूतान 


भूतानमधील सुंदरता तर अगदी संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. जगातील सर्वात ग्रीन देशात भूतान लोकप्रिय आहे. भूतान हे फक्त बजेट फ्रेंडली नसून भारताच्या जवळ असल्यामुळे तुम्ही तिथे अधिक दिवस राहू शकता. जर तुम्ही भूतानला जायचा प्लान करत असाल तर तुम्ही दार्जिलिंगला जाणं हे बेस्ट ऑप्शन आहे. दार्जिलिंगच्या बागडोगरा पर्यंत फ्लाइटने जाण्यासाठी फक्त ६ हजार रुपये खर्च होतील. बागडोगरा पोहोचल्यानंतर तुम्ही फक्त १५०० रुपयांत भूतानला जाऊ शकता. खास गोष्ट म्हणजे इथे राहण्यासाठी तुम्ही अगदी स्वस्त म्हणजे ५०० रुपये दरात रूम घेऊ शकता. 



७) नेपाल


भूतानप्रमाणे नेपाल देखील फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जर योग्य वेळी तिकीट बुक केलं तर १० हजारात येण्या - जाण्याचं फ्लाईटचं तिकिट बुक करू शकता. तुम्हाला इथे ७०० रुपयांत हॉटेलचा दर मिळेल.