`या` Top Management Colleges मध्ये Admission नंतर मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी
Top Mangement Colleges in India: सध्या सगळीकडेच परीक्षांचे वातावरण आहे. तेव्हा तुम्हीही नव्या एडमिशन्ससाठी (Admission News) तयार झाला असालच. तुम्ही मॅनेजमेंटच्या काही कोर्सेससाठी अप्लाय करणार असाल तर तुम्ही या काही कॉलेजेसमध्ये (How to Apply for Management Colleges) अप्लाय करू शकता. या लेखातून जाणून घेऊया याच काही कॉलेजेसबद्दल!
Top Mangement Colleges in India: मार्च आणि एप्रिलचा महिना आता संपत आला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exam 2023) एव्हाना संपतही आल्या असतील त्यामुळे विद्यार्थी आणि पालक पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी प्लॅनिंग (Academic Year) करत असतील. विद्यार्थ्यांसाठी अनेक ऑप्शन सध्या उपलब्ध आहेत त्यातून आता मॅनेजमेंटच्या कोर्सेसनाही (Management Courses) ते अर्ज करू शकतात. यातून तुम्हाला तुमची पदवी पुर्ण झाल्यानंतर कॅम्पस प्लसमेंटची (Campus Placements) चांगली संधीही मिळू शकते. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की देशात असे कोणते टॉप मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत जिथे विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घेऊ शकता. ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असेल.
आयआयटी दिल्ली - हे कॉलेज देशातील सर्वात टॉप कॉलेज आहे. येथे तुम्हाला एडमिशन मिळवण्यासाठी प्रवेशपरीक्षा देणे गरजेचे आहे. डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनियरिंग - हे कॉलेज AIRF रॅकिंगमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. येथेही तुम्हाला प्रवेशपरीक्षा देणे आवश्यक आहे.
आयआयएम लखनऊ - हे कॉलेजही देशातील सर्वात टॉपचे कॉलेज आहे. येथे तुम्हाला मॅनेजमेंटच्या चांगल्या फॅसिलिटी मिळतील.
आयआयएम इंदौर - आयआयएम लखनऊप्रमाणे हे कॉलेजही सर्वात टॉपचं कॉलेज आहे. येथेही तुम्हीही एमबीएसाठी ए़डमिशन घेऊ शकता.
आयआयटी मद्रास - आयआयटी मद्रास येथेही तुम्हाही एडमिशन घेऊ शकता.
आयआयएम कोझीकोड - आयआयएम कोझीकोडही देशातील सर्वात टॉपचे एमबीए कॉलेज आहे. त्यामुळे येथेही तुम्ही एडमिशन घेऊ शकता.
याशिवाय आयआयटी अहमदाबाद, आयआयटी कोलकता आणि आयआयटी बंगलोर ही कॉलेजेसही खूप चांगली आहेत. मुंबईतही तुम्ही पार्ट टाईम आणि फूल टाईम असे कोर्सेस करू शकता. येथेही आयआयटी मुंबई, एनएमआयएमएस, एस. पी. जैन इस्टिट्यूट इन मॅनेजमेंट आणि झेवियर इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या कॉलेजेसमध्ये तुम्ही एडमिशन घेऊ शकता. तुम्हाला यासाठी एक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते. एकदा का तुम्हाला या कॉलेजमध्ये एडमिशन मिळाली की तुमच्या पुढे विविध संधी या उपलब्ध होतील.
मुंबईतील तुम्हाला मॅनेजमेंट कॉलेजेस चांगले पर्याय मिळू शकतात. के. जी. सौमेया इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई विद्यापीठ, एमईटी इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शैलेश मेहता स्कूल ऑफ मेनेजमेंट अशा काही टॉपच्या कॉलेजेसमध्ये तुम्हीही एडमिशन घेऊ शकता. या कॉलेजच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. तेव्हा तुम्हीही या कॉलेजेमध्ये एडमिशन घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया जाणकारांचा सल्ला घ्या.)