ना IIT, ना IIM तरीही तरुणीनं मिळवलं तब्बल 60 लाखांचं पॅकेज, LinkedIn ने दिली ऑफर
टॉव वुमन कोडर अशी ओळख असणाऱ्या मुस्कान अग्रवालला लिंक्डइन 60 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. मुस्कानने या ऑफरसह अनेक रेकॉर्ड मोडले असून, तरुणींसाठी नव्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी खुली केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुस्कानने IIIT Una मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.टेकचं शिक्षण घेतलं. यानंतर आता ती आपल्या संस्थेची सर्वाधिक पॅकेज घेणारी विद्यार्थी ठरली आहे. टॉव वुमन कोडर अशी ओळख असणाऱ्या मुस्कान अग्रवालला लिंक्डइन 60 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. मुस्कानने या ऑफरसह नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून, तरुणींसाठी नव्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी खुली केली आहे.
TECHGIG GEEK GODDESS 2022 ची चॅम्पिअन
मुस्कान अग्रवालच्या या विलक्षण कामगिरीचा प्रवास सुरू झाला जेव्हा ती 'टॉप वुमन कोडर' म्हणून उदयास आली. TechGig Geek Goddess 2022 मध्ये तिने 1.5 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं होतं. या स्पर्धेत तिने 69 हजार महिला कोडर्सना पराभूत केलं होतं. या स्पर्धेत अंतिम स्पर्धकांनी त्यांचे प्रोग्रामिंग सोल्यूशन्स दाखल करण्यासाठी सलग चार तास न थांबता कोडिंग केलं.
Geek Goddess ही भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान समुदाय TechGig ने केवळ महिलांसाठी सुरु केलेली वार्षिक कोडिंग स्पर्धा आहे. प्रतिभावान महिला अभियंता आणि आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यासांठी ही स्पर्धा एक व्यासपीठ म्हणून काम करतं.
उदयास येणारी नवी कोडिंग स्टार
मुस्कान अग्रवाल कोडिंगसाठी अनोळखी नाही. ती मागील अनेक वर्षांपासून तिच्या याचा अभ्यास करत आहे. 2021 मध्ये, तिने गर्लस्क्रिप्ट फाऊंडेशनसोबत काम करताना विविध ओपन-सोर्स प्रकल्पांमध्ये योगदान दिलं.
शिकण्याच्या आपल्या इच्छेपोटी तिला LinkedIn च्या मेंटरशिप प्रोगाममध्ये संधी मिळाली. एकूण 40 तरुणींची यासाठी निवड करण्यात आली होती. येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. याशिवाय तिने TechCurators मध्ये इंटर्नशिप केली आहे. जिथे तिने HackerEarth, Mettl आणि TestGorilla सारख्या कोडिंग प्लॅटफॉर्मसाठी डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम समस्या निर्माण केल्या.
याव्यतिरिक्त, तिने निर्माण करण्यात आलेल्या समस्यांचा अभ्यास केला. 2022 मध्ये, मुस्कानने हार्वर्ड WECode स्कॉलर म्हणून ओळख मिळवली, तिने हार्वर्ड विद्यापीठातील अंडरग्रेजुएट महिलांनी आयोजित केलेल्या WECode या जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी-रन टेक कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.
MyFab11 आणि LinkedIn मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर इंटर्न म्हणून काम करण्यापासून ते IIIT Una मधील CodeChef मध्ये मीडिया आणि आउटरीच चॅप्टर लीडर म्हणून भूमिका स्वीकारण्यापर्यंत मुस्कानच्या यशापर्यंतच्या प्रवासात तिने अनेक अनुभव घेतले आहेत.
नवा रेकॉर्ड
जुलै 2023 मध्ये, मुस्कान अग्रवालने LinkedIn कडून 60 लाखांच्या नोकरीच्या ऑफरसह रेकॉर्ड तोडले, जिथे तिने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम सुरु केलं आहे. तिचं यश भारतातील समर्पित तरुण कोडर्सची अविश्वसनीय क्षमता दर्शवते.
गतवर्षी, IIIT-Una मधील दुसर्या प्रशिक्षणार्थीने 47 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवले आणि 2019-23 बॅचच्या प्रशिक्षणार्थीपैकी अंदाजे 86 टक्के प्रशिक्षणार्थींना सुमारे 31 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले.