चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना कोर्टाने ठरवलं दोषी
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
चारा घोटाळा प्रकरणात सुनावणीदरम्यान रांची स्पेशल सीबीआय कोर्टाने लालू यांच्यासह १५ आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर ७ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.
रांची सीबीआय कोर्टामध्ये लालू यादव हजर आहेत. निर्णय त्यांच्याच बाजुने येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. पण तसं तरी सध्या दिसत नाहीये. लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.