पणजी : ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत असा तिहेरी संगम साधत गोव्यामध्ये जगभरातून पर्यटक दाखल होतात. आज ख्रिसमस असल्यानं ख्रिस्ती बांधवांसोबतच पर्यटकांनी गोव्यातील चर्चमध्ये हजेरी लावली आहे. गोव्यात मिडनाईट मासने ख्रिसमसला सुरवात झाली असून सगळ्याच चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ख्रिसमसच्या सुट्टीबरोबरच थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात जगभरातून पर्यटक दाखल होत आहेत. यामुळे रिसॉर्ट आणि हॉटेल्स फुल झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. 


समुद्रकिनारी ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी दरवर्षी पर्य़टक मोठ्या संख्येने गोव्यात येतात. ऐवढंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार देखील गोव्यात येतात. गोवा सरकारने देखील यासाठी जय्यत तयारी केली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोवा पोलीस नजर ठेवून आहेत.



पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालक वेगवेगळ्या प्रकारे ऑफर देत असतात. गोव्यात नामांकित डिजेसना आमंत्रित केलं जातं. पार्टी म्हटलं की डिजे आणि डान्स तर असणारच. यासाठी खास नियोजन केलं जातं.