बंगळुरू : धरणाच्या भिंतीवर चढण्याचं साहस करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. पर्यटक पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा आनंद घेत होते. त्याचवेळी हा तरुण धरणाच्या भिंतीवर 30 फूट वर चढून गेला. पण, याची मस्ती याला चांगलीच महागात पडली. काही वेळातच तो वरून कोसळला आणि धाडकन आपटला. या तरुणाचा जीव वाचला मात्र तो गंभीर जखमी झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना कर्नाटकच्या चिकबल्लापूर इथल्या श्रीनिवास धरणावरची आहे. पण, नसतं धाडस कशासाठी? हाच प्रश्न उपस्थित करत अशांना वेळीच आवरा अशी मागणी केली जाते.



ही घटना चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणातील आहे. धरणातून सतत पाणी वाहत आहे आणि वाहत्या पाण्याच्या मध्यभागी एक माणूस भिंत चढण्याचा प्रयत्न करतो. तो अर्ध्याहून जास्त अंतर चढणार होता आणि खाली उभे असलेले लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होते. काही लोक त्या व्यक्तीचा व्हिडीओ बनवत होते, पण नंतर ही घटना घडली.