शिमला : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागातील बहुतांश सगळाच परिसर हा बर्फाच्छादित झाला आहे. ANI 'एएनआय' या वृत्तसंस्थेने या भागांमधील काही फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. जे पाहता तेथील हवामानाचा अंदाज लावता येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या kedarnath केदारनाथ धाम मंदिर परिसरावरही बर्फाची चादर पसरली आहे. मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर शुभ्र बर्फाच्या चादरीत जणू गुरफटल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र बर्फच बर्फ आणि मधोमध उभं असणारं हे पवित्र श्रद्धास्थान असं एकंदर दृश्य सध्या केदारनाथ मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे. 


हिमाचल प्रदेशातही सुरु आहे जोरदार बर्फवृष्टी


तापमानाच्या पाऱ्याने हिमाचल प्रदेशातही Himachal Pradesh निचांक गाठला आहे. येथील नारकांडा येथे होणाऱ्या वर्फवृष्टीच्या क्षणांची झलक एएनआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये पावसाचे थेंब पडावेत तसा भुसभुशीत बर्फ सर्वत्र पडत आहे. 


हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये असणारी बर्फाची चादर पाहता प्रशासनाने स्थानिक आणि पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. 




हवामान खात्याकडून येथील अनेक भागांमध्ये सतर्कतेचा 'पिवळा' इशारा / yellow warning  देण्यात आला आहे. हा इशारा पाहता स्थानिक आणि पर्यटकांनी डोंगराळ भागांमध्ये जाणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवसांमध्येही येतील वातावरणात असंच चित्र पाहायला मिळणार आहे. 



कुफरी, नारकांडा आणि खडापठार या भागांमधील रस्तेवाहतुकीवरही बर्फवृष्टीचा परिणाम झाला आहे. परिणामी शिमला प्रशासनाकडून कोणतीही अचणीची परिस्थिती उदभवल्यास 0177-2800880, 2800881, 2800882 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 आणि 1070 यांवर संपर्क साधाण्याची सुविधा पुरवली आहे.