Boss Reply to Employee : कंपनी आणि त्यांच्या मॅनेजर्सच्या सक्तीच्या वागण्याचे अनेक प्रकार या अगोदरही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण आता घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एका कर्मचाऱ्याच्या कार दुर्घटनेवर मॅनेजरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकरी आपला संताप व्यक्त रत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक कर्मचारी कार दुर्घटनेत वाचला यानंतर त्याचा मॅनेजरशी झालेला संवादाचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. हैराण करणाऱ्या या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कर्मचारी अपघाताबद्दल सांगत असताना मॅनेजर कसा भावना शून्य होऊन प्रतिक्रिया देत आहे. 


स्क्रीनशॉर्टमध्ये पाहू शकता की, कर्मचाऱ्याचा झालेला अपघात हा अतिशय भयंकर आहे. मात्र मॅनेजरने या अपघातावर अजिबात चिंता व्यक्त न करता त्याने तो अद्याप ऑफिसमध्ये का आला नाही? याबाबत प्रश्न विचारायला सुरु करताना दिसतो. एवढ्यावरच मॅनेजर थांबत नाही तर, कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही असे देखील त्याने सांगितले. 



मॅनेजरने चॅटमध्ये लिहिलं की, हे कळतंय की, तुला यायला उशीर होणार आहे. पण कुटुंबातील कुणाचा मृत्यू झाला तरच ऑफिसमधून तुला सुट्टी मिळू शकते. नाहीतर कोणतेही कारण माफी योग्य राहणार नाही. 


X वरील पोस्ट अंदाजे 16 दशलक्ष वेळा पाहिली गेली आणि इंटरनेट युझर्सनी अनेक कमेंट करुन प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर कामाचं टॉक्सिक ठिकाण आणि अशा कठोर मॅनेजरबाबत चर्चा होत आहे. एका युझरने लिहिले की, "अशी ठिकाणी काम करणं अजिशय चुकीचं आहे." दुसऱ्याने लिहिले, "मी ही नोकरी सोडली असती." तिसऱ्याने लिहिले, "मी त्यांना एक कार्ड देईन ज्यामध्ये मी तुमचे नुकसान झाल्याचं मॅनेजरला सांगून नोकरी सोडेन.."