चंदीगढ : आपल्याला तर हे माहितच आहे की वाहतुकीचे काही नियम असतात आणि आपल्या सगळ्यांना त्याचे पालन करावे लागते आणि जर कोणी त्याचे पालन केले नाही तर मग त्याचा दंड देखील भरावा लागतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपल्याच लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने हे नियम बनवले आहेत. जे आपल्याला जागरुक नागरीक म्हणून पूर्ण केले पाहिजे. परंतु तरी देखील असे काही लोक असतात, जे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब सरकारने वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंड भरावा लागणार नाही, तर चुकीची पुनरावृत्ती केल्यास दंडही दुप्पट होईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.


परंतु तुम्हाला माहितीय का की पंजाबमधील वाहतुकीचे नियम मोडलेल्यांना तेथील पोलिसांनी जो दंड लावला तो चर्चेचा विषय ठरला. 


जर कोणी वाहतुकीचा नियम मोडला, तर त्याला रिफ्रेशर कोर्स करावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर परिवहन प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना दोन तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागणार आहेत.


यासोबतच दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. तसेच, जवळच्या रुग्णालयात समाजसेवा करावी लागेल किंवा एक युनिट रक्त दान करावे लागेल असे देखील नियम बनवले गेले आहे.


कोणत्या नियमाचे उल्लंघन केल्यास किती दंड


ओव्हरस्पीडिंगवर आता पंजाबमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाईल. जर कोणी या नियमाचे वारंवार उल्लंघन करताना आढळले तर दंड दुप्पट केला जाईल. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल. या नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. ओव्हरलोड वाहनांवर प्रथम 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दंड दुप्पट भरावा लागेल. तर सिग्नल जंप केल्यावर एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत आणि जर नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल.