मुंबई : गाडी चालवणे हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला गाडी कशी चालते तिचे मेकेनिक आणि वाहतुकीचे नियम माहित असणे गरजेचं आहे. जर तुम्ही रस्त्यावर कोणतेही वाहन घेऊन जात असाल तर वाहतुकीचे सर्व नियम पाळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले आणि पोलिसांनी तुम्हाला पकडले तर तुम्हाला चलन भरावे लागेल. आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालानच्या दंडाची रक्कम फार वाढली आहे. त्यामुळे गाडी चालवण्याचा परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, काहीवेळा असे घडते की, आपण नकळतपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो. अशा परिस्थितीत, एक सक्षम नागरिक म्हणून, आपण सर्व वाहतूक नियमांबद्दल जागरूक असले पाहिजे आणि त्यानुसार प्रवास केला पाहिजे. कारण, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल.


धोकादायक ड्रायव्हिंग आणि लाल दिवा असताना म्हणजेच सिग्नल तोडल्यामुळे आता तुम्हाला तुरुंगवात जावे लागू शकते. आता तुम्ही म्हणाल की, लाल दिवा असेल तेव्हा किंवा सिग्नल तोडल्यामुळ तुरुंगवास का? याला चलन का लागत नाही? परंतु हे लक्षात घ्या की, प्रत्यक्षात ही मोठी गोष्ट आहे. असे केल्याने, तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांची तसेच तुमची सुरक्षितता धोक्यात आणता.


धोकादायक ड्रायव्हिंग/राइडिंग आणि जंपिंग रेड लाईट


धोकादायक ड्रायव्हिंग (कार चालवणे) किंवा स्कुटर चालवल्याने, तसेच जंपिंग रेड लाईट म्हणजेच सिग्नल मोडल्याने 1 हजार  ते 5  हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष तुरुंगातही जावे लागू शकते.


या दोन्ही गोष्टी एकाच वेळी देखील पोलिस लागू करु शकतात. म्हणजेच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल आणि एक वर्ष तुरुंगातही जावे लागेल. यासोबतच तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त केला जाऊ शकतो.