मुंबई : Traffic Rules: रस्त्यावर वाहन चालवताना सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दंड आकारला जातो.  वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. असे अनेक वाहतूक नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला यापैकी दोन नियमांची माहिती देणार आहोत.

 

दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यास 10,000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवासही होऊ शकतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडले जाता. तेव्हा हा नियम लागू होतो. याशिवाय, पुन्हा असे करताना पकडले गेल्यास, 15,000 रुपये दंड आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. पोलिसांना आवश्यकता वाटल्यास ते पकडलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवू शकतात आणि त्याला तुरुंगात पाठवू शकतात आणि त्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

 

याशिवाय विम्याशिवाय गाडी चालवताना पकडले गेले तरी तुरुंगवासही होऊ शकतो. विम्याशिवाय वाहन चालवताना पकडल्यास, पोलीस तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड करू शकतात. याशिवाय तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.