TRAI Guideline: सध्या स्मार्टफोनचं युग असलं तरी प्रत्येकाच्या घरी आपल्या टीव्ही पाहायला मिळतो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीपासून कलर टीव्ही आणि आता स्मार्टटीव्ही असा प्रवास सुरु आहे. थोड्या बहुत प्रमाणात टीव्ही पाहणं कमी झालं असलं तरी लोकप्रियता काही कमी झालेली नाही. डायरेक्ट टू होम आणि केबलद्वारे आपल्या टीव्हीवर शेकडो चॅनेल दिसतात.आजही लोकं सिरीयल, चित्रपट, लाईव्ह सामने पाहण्यासाठी टीव्हीलाच पसंती देतात. जर तुम्हालाही टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ट्राय म्हणजेच इंडिया टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीनं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ट्रायनं टॅरिफ ऑर्डर 2.0 रिवाइज केलं आहे. त्यामुळे कोट्यवधी ग्राहकांना फायदा होणार आहे. चला तर जाणून घेऊयात


काय आहे नियम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन नियमांनुसार, 19 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे सर्व चॅनेल पॅकेजमध्ये समाविष्ट केले जातील. ट्रायच्या या निर्णयानंतर केबल आणि डीटीएच ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रायकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नियमावली 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत. यासोबतच ट्रायने म्हटले आहे की, सर्व चॅनेल्सनी हे सुनिश्चित करावे की 1 फेब्रुवारीनंतर ग्राहकांना त्यांनी निवडलेल्या चॅनेल किंवा पॅकेजनुसार सेवा दिल्या जातील.


बातमी वाचा- Loan Moratorium: कर्जाचा हप्ता भरताना अडचण होत आहे! बँकेकडे असा मागाल अवधी


बदल नोंदवले जातील


सर्व ब्रॉडकास्टर्स त्यांच्या चॅनल, चॅनलची एमआरपी आणि चॅनलच्या पॅकेजच्या रचनेत झालेल्या बदलात 16 डिसेंबरपर्यंत अहवाल देतील.पॅकेजची किंमत निश्चित करताना, ब्रॉडकास्टर त्यात समाविष्ट असलेल्या सशुल्क चॅनेलच्या कमाल किरकोळ किंमतीच्या (MRP) बेरीजमधून जास्तीत जास्त 45 टक्के सूट देऊ शकतात.