मुंबई : दिवाळीचा सण अगदी एक आठवड्यावर आहे. शाळांमध्ये परिक्षा देखील संपल्या आहेत. सगळीकडे दिवाळीचा, सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सणाच्या निमित्ताने प्रवास महागला आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणामुळे तिकिटाची मागणी वाढली आहे. यामुळे नियमित धावणाऱ्या ट्रेन बुक झाल्याअसून जादा ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. त्याचे दर वाढले आहेत. एवढंच काय तर विमान प्रवास देखील महागला आहे. सुट्याच्या दिवसांमध्ये विमान तिकिटाची मागणी वाढल्यामुळे तिकिट महागलं आहे. 


दिवाळी हा सण कुटुंबासोबत साजरा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. विमान प्रवास करून घरी पोहोचण्याचा विचार करत असाल तर दररोजच्या तिकिटापेक्षा दोन ते तीन टक्के अधिक दर वाढले आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. 


दिल्ली-वाराणसी या मार्गावर चालणारे वंदे भारत ट्रेनमध्ये तिकिट उपलब्ध नाही. वेटिंग तिकिट घेण्याचा विचार करत असाल तर एसी चेअर तिकिट 1755 रुपये आहे तर एक्झिक्यूटीव क्लास 3300 रुपये तिकिट आहे. तेजस ट्रेनच्या एसीचे तिकिट हे 1550 रुपये असून एक्झिक्युटिव क्लास करता 4435 रुपये आकारले जाणार आहेत. 


विमान प्रवास हा अतिशय सुखकर असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक ते दीड तासाच्या प्रवासाकरता 24 हजार रुपये मोजावे लागणार आहे. सामान्य दिवसांमध्ये हाच तिकिटाचा दर चार ते पाच हजार रुपये असते.