नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता दरम्यान १८,००० कोटींचा महत्वकांक्षी प्रकल्प


महत्वकांक्षी प्रकल्प


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गतिमान करण्यासाठी एक महत्वकांक्षी प्रकल्प आखला आहे.  सध्या तो मंत्रीमंडळाच्या संमतीसाठी पाठवण्यात आलाय.
निती आयोगाने या प्रकल्पाला आधीच मंजुरी दिली आहे.


१६० किमी प्रति तासाची गती


या महाकाय प्रकल्पामुळे रेल्वेचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. रेल्वेची क्षमता कमालीची वाढून १६० किमी प्रति तास या गतीने ती धावणार आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या महानगरांना त्याचा लाभ होणार आहे. 


आधुनिकीकरण


तीन महानगरांमधल्या प्रवासाचा वेळ कमी करत रेल्वेचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. यात ३००० किमी मार्गावर संरक्षक जाळे उभारणं, सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण आणि इतरही अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.


सुखकारक प्रवास 


याव्यतिरिक्त भारतभर आठ विभागांमध्ये रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. यामुळे देशभरातच रेल्वेचं जाळं अधिक कार्यक्षम होणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.