मथुरा: एका युवकाचे त्याच्या नकळत जबरस्तीने लिंगपरीवर्तन केल्याची धक्कादयक घटना पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील नौहझील गावातील एक तरूण गेली काही वर्षे वृंदावन येथे राहतो. तो मंदिर आणि इतर प्रार्थनास्थळे आणि धार्मिक कार्यालयांमध्ये नाचगाण्याचे कार्यक्रम करतो. दरम्यान, आरोप आहे की, हा तरूण ज्या लोकांसोबत नाचगाण्याचे काम करत असे, त्या लोकांनी गुंगीचे औषध देऊन त्याचे जबरस्तीने लिंगपरिवर्तन केले.


युवकाला खोलीत कोंडून ठेवले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगलामुखी समुदायातील ८  लोकांनी जानेवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले होते, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तरूण शुद्धीवर आला तेव्हा, त्याच्या ध्यानात आले की, त्याचे लिंगपरिवर्तन करण्यात आले आहे. विशेष असे की, आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा तरूणाने जेव्हा विरोध केला. तेव्हा, त्याला समुहातील लोकांनी एका खोलीत कोंडून ठेवले. या युवकाला गेली ७ महिने एकाच खोलीत बंद करून ठेवले होते. दरम्यान, संधी मिळताच पीडित युवकाने तेथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर पीडित तरूणाने कोतवाली पोलिसस्थानकात मंगलामुखी समुहाची प्रमुख छोटी सून, सहकारी पूजा, कृष्णा, हुसैना, ऑटो चालक सोनू आणि फर्रूखाबाद येथील डॉक्टर राज के याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.


दोन आरोपींना अटक


पोलिसांनी पीडित तरूणाच्या तक्रारीवरून ६ लोकांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.तसेच, तपासही सुरू केला आहे. पोलिसांनी पूजा आणि कृष्णा नामक मंगलामुखी समुहातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पीडित युवकाला पत्नी आणि एक मुलगाही आहे. कुटुंबावर ओढावलेल्या आर्थिक स्थितीमुळे हा तरूण नाचगाणी करून उदरनिर्वाह करत होता. या तरूणावर मंगलामुखी समूहाची नजर पडली आणि त्यांनी त्याला आपल्या जाळ्यात ओढले. आपल्याबाबत घडलेल्या प्रकाराचा योग्य तपास झाला नाही तर, आपण मोठे रॅकेट बाहेर काढू असेही पीडित तरूणाने म्हटले आहे.