मुंबई :  केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीवर वाहतूकदारांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय. केंद्र सरकारचं नवं धोरण वाहतुकदारांचे संसार उद्ध्वस्त करणारं आहे. त्यामुळं ते मागे घ्यावं, अशी मागणी केली जात होती. पण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय. वाहन स्क्रॅप करणाऱ्यांना ग्राहकांना उत्पादकांकडून याचा फायदा मिळेल असे गडकरी म्हणाले. या पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होऊन अर्थव्यवस्था आणि उद्योगास फायदा होईल असे गडकरींनी सांगितले. 


आंदोलनाचा इशारा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळं मालवाहतूकदार अडचणीत सापडलेत. या धोरणानुसार 15 वर्षांवरील व्यावसायिक वाहनं आणि 20 वर्षांवरील खासगी वाहनं भंगारात काढावा लागणार आहेत. त्यामुळं हजारो मालवाहतूकदारांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं केलीय. या धोरणाचा पुनर्विचार करावा, अन्यथा देशभर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिलाय.



किंमती होणार कमी


दरम्यान गडकरींनी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. नव्या स्क्रॅपेज धोरणामुळे धातूंचा पुनर्वापर करता येईल,  वायू प्रदूषणात घट होईल, नवीन वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारेल. यामुळे आयात खर्च कमी होईल असे गडकरी यांनी आपल्या उत्तरात सांगितले. या धोरणाच्या मंजुरीनंतर भारतात ऑटोमोबाईल हब तयार होऊन वाहनांच्या किंमतीही कमी होतील असेही ते म्हणाले.