Travel Without Reservation: सणासुदीच्या काळात रेल्वेचं तिकीट (railway ticket) मिळणं फार कठीण होऊ बसत. अशा परिस्थितीत रेल्वेतील वाढती गर्दी पाहता भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. तुमचे तिकीट कन्फर्म (railway ticket confirm) होत नसेल, तरीही तुम्ही प्रवास करू शकता. नवीन योजनेनुसार, आरक्षण नसलेल्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये (train passanger) प्रवास करण्याची परवानगी असेल. कोणते प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि ही तिकिटे कशी बुक करू शकतात ते सविस्तर जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाशिवाय प्रवास करा


जर तुमचे तिकीट कन्फर्म (ticket confirm) झाले नसेल तर तुम्ही वेटिंग (ticket waiting) तिकिटाद्वारे प्रवास करू शकता. जर तुम्ही तिकीट काउंटरवरून (ticket counter) तिकीट खरेदी केले असेल. तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्हाला टीटीकडून (TC) तिकीट काढावे लागेल. जर तुमच्याकडे टीसीकडून (railway TC) काढलेले तिकीट असेल तर तिकीट तपासक तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. ही सुविधा ऑनलाइन तिकीट बुक (Online ticket booking) करणाऱ्यांसाठी उपलब्ध नाही. तिकीट ऑनलाइन कन्फर्म झाले नाही तर अशा प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही. तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळतील.


रेल्वे विशेष ट्रेन चालवणार आहे


सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने दिवाळी (diwali 2022) आणि छठ दरम्यान प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने (railway minister) जाहीर केले की रेल्वे दिवाळी आणि छठ निमित्त 179 विशेष गाड्या चालवणार आहे. बहुतांश गाड्या पूर्वांचलसाठी धावतील. बिहारसह पूर्वांचल राज्यांमध्ये छठचा विशेष सण येत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत राहणारे पूर्वांचलचे रहिवासी विशेष ट्रेनचा लाभ घेऊ शकतात. इतर काही राज्यांमध्येही सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे.


वाचा : सोन्यावर कधी, कुठे आणि किती कर आकारला जातो, खरेदी करणार असाल तर वाचाच


कन्फर्म तिकीट कसे मिळवायचे


विशेष गाड्या चालवल्यास गाड्यांची संख्या वाढेल. पण प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशा स्थितीत तिकीट मिळणे कठीण होणार आहे. कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी आगाऊ बुकिंग करा, अन्यथा तिकीट मिळणे अवघड आहे. तत्काळ तिकीट बुक करून तुम्ही कन्फर्म तिकीट देखील मिळवू शकता, परंतु सध्याच्या स्थितीत तत्काळ तिकीट मिळणे कठीण आहे, त्यामुळे विंडो तिकीट हा सर्वोत्तम मार्ग आहे.