Viral News: पाणीपुरी प्रेमींना एकदा सोशल मीडियावरील (Social media) एका व्हिडीओनंतर जोरदार धक्का बसला होता. कारण पाणीपुरी (Pani Puri) विक्रेत्याचं घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर देशभरात एकच खळबळ माजली होती. पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यामध्ये लघवी मिक्स (Urine in Pani Puri) केली होती. असाच काहीसा धक्कादायक (shocking) प्रकार समोर आला आहे. एका भाजी विक्रेत्याचं संतापजनक कृत्य स्थानिकांनी पकडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्षात भाजीवर लघवी (Urine) करून विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्याचं (Vegetable Seller) किळसवाण कृत्य लोकांनी रंगेहात पकडलं. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral) करण्यात आला. हा व्हिडिओ पाहून लोकांनी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जेव्हा त्या व्यक्तीला विचारले तेव्हा त्याने आधी बहाणा केला, पण नंतर आपली चूक मान्य केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. (Treading news bareilly person selling Urine on vegetables nm)


भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल 


उत्तर प्रदेशातील (UP) बरेलीमधील (Bareilly) जनकपुरी (Janakpuri) भागातील धक्कादायक घटना आहे. शरीफ (sharif) असं आरोपी भाजी विक्रेत्याचं नाव आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू जागरण मंचच्या (Hindu Jagran Manch)कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. सध्या पोलिसांनी (police) आरोपी शरीफला पकडलं असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शरीफविरुद्ध प्रेम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कान पकडून मागितली माफी 


आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला. एवढंच नाही तर आरोपी भाजी विक्रेत्याने कॅमेऱ्याला कान धरून माफीही मागितली.असंच एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी मेरठमधून (Meerut) समोर आलं होतं. जिथं एक व्यक्ती चपती (Chapati) बनवताना त्यावर थुंकताना (spit) पकडला गेला होता. थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.