IAS Tina Dabi: आयुष्यात प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटतं असते.  Tina Dabi च्या येण्याने त्याच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना घाम फुटतो. त्या  Tina Dabi पण एकदा घाबरल्या होती. अगदी त्यांना मनाविरुद्ध एक कामही करावं लागलं होतं. काय आहे नेमकं प्रकरण आणि काय काम करावं लागलं होतं हे खुद्द Tina Dabi यांनी सांगितला आहे. (treading news ias tina dabi was so cared of a phone call)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tina Dabi सांगतात की, एका पालकाचा फोन आला होता ज्यांनी सांगितले की कृपया माझ्या मुलीशी बोला, तिने 2 दिवसांपासून काहीही खाल्लेल नाही. त्यांची एकच मागणी आहे की, तुम्ही फक्त तुमच्याशी बोलावे. त्यानंतरच ती काही पण खाणार. माझ्या मुलीसाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. या एका कॉलमुळे माझ्या अंगावर काटा आला होता. Tina Dabi यांनी मनाविरुद्ध त्या मुलीशी संवाद साधला होता. 


Tina Dabi या अनेक इच्छुकांसाठी प्रेरणा आहे कारण त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये टॉप केलं होतं. 2016 मध्ये जेव्हा त्या यूपीएससी टॉपर झाल्या तेव्हा त्या फक्त 22 वर्षांच्या होत्या. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर Tina Dabiला यावर्षी प्रथमच कलेक्टर पद मिळालं. Tina Dabi यांना राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर बनवण्यात आलं आहे.


Tina Dabi या मूळच्या मध्य प्रदेशातील भोपाळच्या आहेत. Tina Dabi यांच्याप्रमाणेच त्यांची धाकटी बहीण रिया दाबीनेही आयएएस परीक्षेत 15 वा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. Tina Dabiयांनी राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलं आहे. या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती. नुकतेच त्याच्या गोव्यातील फोटोचीही सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.