Trending Dance Video: सोशल मीडियावरील एखादा व्हिडीओ भावला की तो वेगाने व्हायरल होतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओची चर्चा देखील रंगते. त्यामुळे कधी काय व्हायरल (Viral) होईल सांगता येत नाही. एखाद्या खास गाण्यावर डान्स (Viral Dance Video) करायला सगळ्यांनाच आवडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (girl dances on kesariya alia bhatt style winning internet viral video marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुलगी डान्स करताना (Little Girl Dance On Kesariya Song) दिसत आहे. या डान्स व्हिडिओमध्ये ही चिमुरडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रम्हास्त्र (Brahmastra) चित्रपटातील प्रसिद्ध 'केसरिया' गाण्यावर (Kesariya Song) नाचताना दिसत आहे. 


केसरिया गाण्यावर ही चिमुकली सेम टू सेम रणबीर (Ranbeer kapoor) आणि आलियासारख्या (Alia bhatt) स्टेप्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक मोठा टीव्ही दिसतोय. त्यात केसरिया गाणं लागलंय. व्हायरल झालेल्या डान्स व्हिडिओमध्ये मुलीने पांढरा टी-शर्ट, निळी जीन्स आणि लाल श्रग घातलेला दिसत आहे. 


आणखी वाचा - Senegal Video: संसदेत तुफान राडा, महिला खासदारावर उचलला हात अन् सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी!


दरम्यान, व्हारयल डान्स क्लिप @radadia_vyomi या इन्स्टाग्राम हँडल आयडीवर (Instragram) शेअर करण्यात आली आहे, या हँडलचे इन्स्टावर 75 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेकांनी यावर अनेक कमेंट (Video Comments) केल्या आहेत. चिमुकलीने आलियापेक्षा भन्नाट डान्स केलाय, असं अनेकांनी कमेंट करत म्हटलंय.