Nagin Dance Viral Video: सोशल मीडियामुळे अनेकाच्या प्रायव्हसीचा भंग झालाय, असा आरोप करण्यात येतो. मात्र, अनेक मजेशीर गोष्टी देखील यामुळे समोर येत असतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात. त्यातील काही व्हिडिओ (Shocking Video) अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही तर काही व्हिडिओ (Funny Video) पोट धरून हसवतात. अशातच एक शाळकरी मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. (Trending Nagin dance video student dance classroom ladke ka dance google trends viral nagin dance omg video went viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही डान्स व्हिडिओ असे असतात, ज्यात डान्स कमी पण नौटंकी जास्त पहायला मिळते. कोंबडा डान्स, गणपती डान्स आणि नागिन डान्स (Nagin Dance) सर्वांत फेमस. अशातच एका शाळकरी मुलाचा नागिन डान्स सध्या व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (School Boy Dance Video) एक विद्यार्थी वर्गातच अचानक नाचू लागतो. त्याची स्टाईल पाहून खचाखच भरलेल्या वर्गात हशा सुरू होतो.


आणखी वाचा - Girls Funny Video: सांगा चूक कोणाची? पोराची की पोरींची? व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल!


पोरगं एवढं बेभान नाचलंय की, वर्गातील पोरी देखील खदाखदा हसू लागल्या आणि काही पोरी घाबरल्याचं देखील दिसून आलं. पोरगं नाचता नाचता ऐवढं जमिनीवर लोळू लागलं. त्यावेळी पोराचा जोश पाहून पोरी मागे सकरून बसल्याचं दिसून आलंय. त्यावेळी शिक्षकांनी अखेर त्याला रोखलं आणि पुढचा कार्यक्रम सुरू केला.


पाहा Video - 



दरम्यान, नागिन डान्सचा (Funny Nagin Dance Video) हा व्हिडिओ yraj.1 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलाय. त्यावर भन्नाट कमेंट देखील करण्यात आल्यात. एका युजरने लिहिलंय की, इसको कोई नागमणी दे देरे बाबा.तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, भाऊच्या टॅलेंटचा आदर करा, हे टॅलेंट भारताबाहेर जायला नको. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.