Trending News : 50 वर्षांच्या एका शिक्षकाने (Teacher) आपल्या 20 वर्षांच्या विद्यार्थिनीबरोबर (Student) लग्नगाठ बांधली. या लग्नामुळे लोकांना पुन्हा एकदा ज्युली आणि मटुकनाथची लव्ह स्टोरी (Julie-Matuknath Love Story) आठवली. 2006 मध्ये बिहारची राजधानी पटनात ज्युली आणि मटुकनाथ यांच्या लग्नाची देशभर चर्चा रंगली होती. आता या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. 50 वर्षांचा शिक्षक आणि 20 वर्षांच्या विद्यार्थिनीची लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक-विद्यार्थिनीच्या लग्नाची गोष्ट
बिहारमधल्या (Bihar) समस्तीपूर मुख्यालयापासून जवळपास 30 किलोमीटर दूर असणाऱअया रोसडा इथं राहणाऱ्या एका इंग्लिश शिक्षकाने शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध जुळले. 50 वर्षांच्या संगीत कुमार (Sangeet Kumar) यांना 20 वर्षांची श्वेता कुमारी (Shweta Kumari) आवडायल लागली. आपल्या मनातील भावना त्याने श्वेता कुमारीकडे बोलून दाखवली. श्वेतानेही फारसे आडेवेढे न घेता त्याला होकार दिला. 


ज्युली-मटुकनाथची प्रेमकहाणी
अशीच काहीशी घटना 2006 मध्ये घडली होती. प्राध्यापक असलेल्या मटुकनाथ यांना आपली विद्यार्थिनी ज्युली आवडायला लागली आणि दोघं एकत्र राहिला लागले. या गोष्टीची भनक जेव्हा मटुकनाथ यांच्या पत्नीला लागली, तेव्हा पत्नी आणि त्यांच्या मुलाने ज्युली आणि मटुकनाथ यांची भररस्त्यात धुलाई केली होती. ज्युलीचे केस धरुन तिला मटुकनाथ यांच्या पत्नीने बेदम चोप दिला होता. ही घटना संपूर्ण देशभर पसरली.


हे ही वाचा : Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती


संगीत कुमार आणि श्वेताची लव्ह स्टोरी
अशीच लव्ह स्टोरी संगीत कुमार आणि श्वेता कुमारी यांची आहे. घरापासून आठशे मीटर दूर असलेल्या इंग्लिश टीचर संगीत कुमार यांच्याकडे श्वेता शिकायला जात होती. शिकवणीदरम्यान श्वेता आणि संगीत टीचरचं प्रेम जुळलं. संगीत कुमार यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. आता संगीत कुमार यांच्याबरोबर लग्न करुन  आनंदी असल्याचं श्वेता कुमारीने सांगितलं आहे.