Aadhaar Card: भारतात अनेक व्यवहारासाठी अगदी आपली ओळखपत्र म्हणून सर्वाधिक वापरण्यात येणारं कार्ड म्हणजे Aadhaar Card. हे सरकारी योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आजकाल कुठल्याही व्यवहार असो बँकेचं खातं, पासपोर्ट अगदी एलपीजी सिलिंडरचं अनुदान आणि शाळा महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया अगदी सगळ्या व्यवहारात आधार कार्ड हे महत्त्वाचं आहे. आजकाल कुठलाही व्यवहार हा आधार कार्डशिवाय अपूर्ण मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतात आधार कार्ड हा खूप महत्त्वाचे कागदपत्रांपैकी एक आहे. त्यामुळे त्यावरील माहिती, पत्ता आणि फोटो हा अपडेट असायला हवा. अनेक लोकांना आधार कार्डवरील फोटो आवडत नाही. कधीकधी हा फोटो खूप अस्पष्ट असतो. त्यामुळे तुमची ओळख होणे कठीण जाते. अशात आता चिंता करायची गरज नाही. कारण तुम्ही आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. (trending news aadhaar card photo update know how to change your aadhaar in maratha)



UIDAIवरुन आधारकार्ड अपडेट करा


जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया मदत करते. तुम्ही UIDAI द्वारे आधार कार्डवरील नाव, मोबाईल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो हे सर्व अपडेट करु शकता. आता आपण समजून घेऊयात हे कसं करायचं ते 


अशाप्रकारे फोटो अपडेट करा 


1.UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा
2. त्यानंतर आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करा
3. हा फार्म घेऊन आधार केंद्र किंवा घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जा
4.आता इथे बायोमेट्रिक डिटेल्स द्या.
5. 25 रुपये+ GST ​​फी भरून फोटो अपडेट करा
6. त्यानंतर तुमचा पुन्हा फोटो काढला जाईल
7. मग आधार कार्डवर नवीन फोटो अपडेट केला जाईल.