भारताचं एकमेव गाव जिथे राहतो एकच परिवार, बाकीचे गेले सोडून, कारण घ्या जाणून!
Indian village: आसामच्या नलबाडी जिल्ह्यात असे एक गाव आहे. बरधनारा असे या गावचे नाव आहे.
Indian village: तुम्ही गावच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील. जिथे शेकडो कुटुंब राहतात. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का ज्या संपूर्ण गावात फक्त एकच कुटुंब राहतं? कदाचित नसेल ऐकलं. कारण हे भारतातील असं एकमेव गाव आहे जिथे एकच परिवार राहतो. हो. आसामच्या नलबाडी जिल्ह्यात असे एक गाव आहे. बरधनारा असे या गावचे नाव आहे. सध्या देशातील गावांची अवस्था दयनीय झाली आहे. चांगले शिक्षण, नोकरी धंदे शहरात असल्याने गावे सोडून तरुण मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतरित होऊ लागले आहेत. प्राथमिक सुविधा नसल्याने काहीजण शहरे सोडून गावी येऊ लागले आहेत. काहीशी अशी कहाणी बरधनाराची आहे.
30 ते 40 वर्षांपूर्वी एक समृद्ध गाव
प्रशासनाची उदासिनता असल्या कारणाने नागरिक आपला गाव सोडू लागले आहेत. 30 ते 40 वर्षांपूर्वी हे एक समृद्ध गाव मानले जायचे. पण 2011 च्या लोकसंख्या मोजणीनुसार येथे केवळ 16 लोक राहतात. खराब रस्ते आणि इतर सुविधांचा अभवा असल्या कारणाने येथे आता केवळ 5 सदस्यांना एक परिवार राहतो.
जिल्हा मुख्यालय नलबाडी येथून हे गाव 12 किमी दूर घोररापारा सर्कलमध्ये आहे. या गावात बिमल डेका, त्यांची पत्नी अनिमा आणि तीन मुले ज्यांची नावे नरेन, दीपाली आणि सेऊती हे राहतात. या गावापासून 2 किमी पुढे बाईक चालवण्यासारखा रस्ता आहे.
2 किमी अंतरावर रस्ता
आम्हाला शाळा, कॉलेजला जाण्यासाठी चांगला रस्ता नाहीय. यावरुन धड बाईकही चालू शकत नाही. थोड्याश्या बऱ्या रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2 किमी अंतर पार करावे लागते. पावसाळ्यात बोडीतून प्रवास करावा लागतो, असे धक्कादायक वास्तव बिमल डेका यांची मुलगी दिपाली यांनी दिली. मुलांची आई अनिमा पावसाळ्यात बोट चालवण्याचे काम करते.
अशा कठीण परिस्थितीतही हा परिवार 3 मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये दिपाली आणि नरेन ग्रॅज्युएट आहेत. तर सेऊती बारावीला आहे. या गावात वीज अद्याप आली नाहीय. त्यामुळे रॉकेलच्या लॅम्पवर मुले अभ्यास करतात.
पावसाळ्यात बुडून जातात रस्ते
खूप पाऊस पडल्यावर गावाशी संपर्क पुर्णपणे तुटून जातो. काही वर्षांपुर्वी या गावाची स्थिती अशी नव्हती. तेव्हा माजी मुख्यमंत्री बिष्णुराम मेधी यांनी गावात जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. पण देखभाल आणि प्रशासनाची उदासिनता यामुळे स्थिती खूप खराब झाली. पूर आल्याने स्थिती आणखीनच बिकट झाली. सरकारने रस्ते बनवले आणि प्राथमिक सुविधा दिल्या तर लोक पुन्हा आपल्या गावात येऊन राहतील, असे म्हटले जाते.