Bride Groom Viral News : लग्नानंतर वधू वराचं (Bride Groom video) नवीन आयुष्य सुरु होतं. आजकाल अनेक तरुण तरुणी लव्ह मॅरेज (Marriage video) करतात. तर काही मुलं ही आई वडिलांच्या पसंतीने लग्न करतात. अनेकांना इच्छा असते लव्ह मॅरेज करायची पण घरच्यांचा भीतीपोटी किंवा विरोधामुळे ते अॅरेंज मॅरेजला बळी पडतात. अशात ना ती मुलगी ना तो मुलगा कोणीही सुखी होतं नाही. लग्नानंतर एक वधू नवरदेवासोबत देवदर्शनासाठी गेली होती. तिथे तिच्या एका कृत्यामुळे दोन कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. (Trending news bride asked the groom for 10 rupees to go to the washroom, and then secretly with the lover boyfriend ran away Viral on Social media)



वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे पैसे मागितले अन् मग...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर माँ विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी नवधू आणि नवरदेव कुटुंबासोबत आले होते. दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य खाण्यापिण्यात व्यस्त होते. त्यावेळी नवरीने नवरदेवाकडे वॉशरुममध्ये जाण्यासाठी 10 रुपये मागितले. मग ती वॉशरुमच्या (bride cheating groom) दिशेने जायला लागली. बराच वेळ झाला वधू परतली नाही. म्हणून मंदिर परिसरात सासर परिसरात शोधाशोध सुरु केली. पण ती बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली. 



अन् मग गुपचूप प्रियकरासोबत...


धक्कादायक गोष्टी तेव्हा कळली जेव्हा पोलिसांनी तपास केला. ती नववधू मंदिर परिसरातून प्रियकराच्या बाईकवर बसून गुपचूप पळून गेली. यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. नववधू उत्तर प्रदेशातील आझमगडची आहे. तर तिचं लग्न जौनपूरमधील एका व्यक्तीशी झालं होतं. या जोडप्याचं 10 फेब्रुवारीला लग्न झालं होतं. लग्नानंतर 19 फेब्रुवारीला हे नवं विवाहित जोडपं कुटुंबीयांसोबत देवदर्शनाला गेलं होतं. तेव्हा ही धक्कादायक घटना घडली.