Bengaluru Traffic: प्रेम कधी, कुठे आणि कोणावर होईल हे काही सांगता येत नाही. अशीच एक 'लव्ह स्टोरी' सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चक्क  Traffic ने बना दी जोडी ! याचीच चर्चा आहे. वाहतूक कोंडी झाली आणि त्यांचे प्रेम फुलले आणि मग....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तुम्ही सर्वांनी बंगळुरू ट्राफिकचे (Traffic congestion) किस्से ऐकले असतील. पण या ट्राफिकमध्ये एखाद्याचे प्रेम फुलले (Love Story) तर ! होय, अशीच एक प्रेम कहाणी घडली. ही लव्ह स्टोरी खरोखरच वेगळी आहे.   सोशल मीडियावर एका प्रेमकथेकडे लोकांचे खूप लक्ष वेधले जात आहे. (Romantic Relationships) या कथेबद्दल जाणून घेतल्यास, तुम्ही याला सिनेमापेक्षा कमी नाही, असेच म्हणाल. पण ही Love Storyची कथा खरी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट (Reddit) वर या प्रेमकथेबद्दल एक पोस्ट करण्यात आली होती. ही प्रेमकथा तुम्हालाही थक्क करू शकते. स्टँडअप कॉमेडीमध्ये बंगळुरूच्या ट्राफिकचा उल्लेख अनेकदा केला जातो. पण ही ट्राफिक कुणाचे आयुष्य बदलणारे क्षणही असू शकतात, याचा कुणी विचारही स्वप्नातही केला नसेल.


वाहतूक कोंडी झाली आणि त्यांचे प्रेम फुलले


रेडिट (Reddit) वर शेअर केलेली ही कथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कमी शब्दात सांगितली गेली आहे. बंगळुरूच्या सोनी वर्ल्ड सिग्नलने दोन मित्रांचे आयुष्य बदलले. संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही ट्विटरवर पोस्ट केलेले हे ट्विट देखील वाचा.


अशी ही 'लव्ह स्टोरी' 


खरंतर या जोडप्यात (Couple) आधीपासून मैत्री होती. पण प्रेमाच्या भावनेचा कधी विचारच केला नाही. एके दिवशी हा मुलगा त्याच्या मित्राला सोडण्यासाठी जात असताना, बांधकाम सुरु असलेल्या इजीपुरा उड्डाणपुलामुळे (Ejipura Flyover)दोघेही वाहतूक कोंडीत अडकले. ट्राफिक जाममध्ये अडकल्यामुळे दोघांनाही भूक लागली आणि त्या दिवशी दोघांनी एकत्र जेवण केले. येथूनच या जोडप्याची प्रेमकहाणी सुरु झाली आणि दोघांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. 



लोकांना आश्चर्य वाटले


आता या जोडप्याच्या लग्नाला (Marriage) दोन वर्षे झाली आहेत, पण इजीपुरा उड्डाणपुलाचे बांधकाम अजूनही सुरु आहे. या कपलची लव्हस्टोरी लोकांना खूप आवडली आहे. बंगळुरु ट्राफिकचा कोणाला फायदा होऊ शकतो यावर अनेक लोकांचा  (Social Media Users) विश्वास बसत नाही.