मुंबई : भारतीयांना सोन्याच्या प्रती मोठे आकर्षण असते. सध्या सोन्याच्या किंमतीत घट होत असली तरी, सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सोने 47 हजार 500 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास ट्रेड करीत आहे. सोन्याच्या किंमती वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात आधी बाजारातील महागाई वाढते त्यासोबतच सोन्याची मागणी वाढते. तसेच महागाई कमी झाल्यास सोन्याची मागणी कमी होते. बाजारात वाढत्या - कमी होत्या महागाई नुसार सोन्याच्या भावात चढ उतार होत असते. 


चलन तरलता वाढल्याने वाढतात भाव
देशाची मध्यवर्ती बँक नेहमीच सोने राखीव ठेवत असते. बाजारात जेव्हा जेव्हा चलनाची तरलता वाढते तेव्हा तेव्हा सोन्याचा सप्लाय कमी होतो अन् सोन्याचे भाव वाढतात. 


व्याज दरांचा परिणाम
आर्थिक प्रॉडक्ट्स आणि सर्विसेससाठी व्याज दरांचा थेट संबध सोन्याच्या मागणीशी असतो. व्याजदरे घसरल्यास ग्राहक कॅशच्या बदल्यात सोने विकतात. ज्यामुळे सोन्याचा सप्लाय वाढतो आणि सोन्याचे दर कमी होतात.


सणांच्या दिवसांत दरांमध्ये वाढ
आपल्या देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदी शुभ मानले जाते. अशावेळी सोन्याचा सप्लाय वाढला तरीदेखील त्याच्या किंमती वाढत असतात.