माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं (Mountaineer) स्वप्न असतं. हजारो गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करण्याचा प्रयत्न करतात. नेपाळचे (Nepal) स्थानिक लोक एव्हरेस्टला सागरमाथा म्हणजेच स्वर्गाचं शिखर म्हणतात. तर तिबेटमध्ये माऊंट एव्हरेस्टला चोमोलुंग्मा म्हणजेच पर्वतांची राणी म्हटलं जातं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे
माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय
हजारो गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर करण्याचा प्रयत्न करतात. काही यशस्वी होतात. तर काहींच्या हाती अपयश लागतं. मात्र हाच माऊंट एव्हरेस्ट दरवर्षी उंचीने वाढत चाललाय. गेल्या 89 हजार वर्षांमध्ये माऊंट एव्हरेस्ट 15 ते 50 मीटरने उंच वाढला आहे आणि दरवर्षी माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतच जात आहे. नेचर जिओसायन्सने हा अहवाल प्रकाशित केलाय. हिमालयातून वाहणाऱ्या आणि सुमारे 89 हजार वर्षांपूर्वी विलीन झालेल्या दोन प्राचीन नद्यांमुळे एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचा दावा केला जातोय.
2020 मधली एव्हरेस्टची उंची
2020 मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर मोजण्यात आली. चीन आणि नेपाळने मिळून संयुक्तपणे ही घोषणा केली होती. माऊंट एव्हरेस्ट 50 ते 60 दशलक्ष वर्ष जुना आहे. दर शतकाला एव्हरेस्टची उंची सुमारे अर्धा मीटर वाढतेय.
भूकंपचा परिणाम
2015 मधल्या भीषण भूकंपाचा एव्हरेस्टच्या उंचीवर परिणाम झाला असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. यापूर्वी चीनने 1975मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर 2005मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. मात्र आता माऊंट एव्हरेस्टची उंची पुन्हा वाढली असण्याची शक्यता आहे. एकीकडे हिमनद्या वितळताना दिसतायत. तर दुसरीकडे माऊंट एव्हरेस्टची उंची वाढताना दिसतेय. मात्र सतत वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे भारतीय नद्यांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो अशी भीती संशोधकांनी वर्तवली आहे.