Trending News : एक अशी विचित्र घटना समोर आली आहे, जी ऐकून प्रत्येक जण हैराण झाला आहे. एका चालकाने आपल्या रिक्षात (Auto Rickshaw) आपल्या लाडक्या भाचीचा फोटो लावला होता. पण ज्यावेळी एक प्रवासी त्या रिक्षात बसला, त्यावेळी तो पाहून त्याला धक्का बसला. फोटोवरुन चालक आणि प्रवाशात वाद झाला आणि प्रकरण थेट पोलिसात गेलं. प्रवाशाने कामावर जाण्यासाठी एक ऑटोरिक्षा बूक केली होती. रिक्षाचालक वेळेवर प्रवाशाने दिलेल्या ठिकाणावर पोहोचला. प्रवासी रिक्षात बसला. पण ज्यावेळी रिक्षात बसलेल्या लहान मुलीच्या फोटोवर प्रवाशाची नजर पडली त्यावेळी त्याला धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो पाहून प्रवाशाला धक्का
प्रवाशाने लहान मुलीचा फोटो पाहून रिक्षा चालकाला ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न विचारला. यावर रिक्षा चालकाने ही आपली लाडकी भाची असल्याचं प्रवाशाला सांगितलं. पण प्रवाशाने तू खोटं बोलत असन ही माझी मुलगी असल्याचं सांगितलं. यावरु चालक आणि प्रवाशात जोरदार वाद झाला. अखेर हे प्रकरण पोलिसात गेलं. झारखंडमधल्या जमशेदपूरमधली ही घटना आहे. 


ती मुलगी प्रवाशाची?
वास्तविक साडे तीन वर्षांपूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता प्रसाद हिने एका नर्सिंग होममध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. यात एक मुलगा आणि एक मुलगी होती. पण नर्सिंग होममधल्या डॉक्टरने मुलीचा मृत्यू झाल्यचं अविनाश आणि संगीता प्रसाद यांना सांगितलं. जन्मत:च मुलीचा तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला असं नर्सिंग होमकडून सांगण्यात आलं. यावर विश्वास ठेवत अविनाश आणि संगीता नवजात मुलाला घेऊन घरी गेले. पण ज्यावेळी अविनाशने रिक्षातील मुलीचा फोटो पाहिलं त्यावेळी ही आपलीच मुलगी असल्याचा दावा त्यांनी केला. अविनाश प्रसाद यांनी नर्सिंग होमवर मुलीची विक्री केल्याचा आरोप केलाय.


रिक्षातल्या फोटोतील मुलीचा चेहरा हुबेहुब आपल्या मुलासारखा असल्याचा दावा अविनाश प्रसाद यांनी केला आहे. या प्रकारानंतर अविनाश आणि संगीता प्रसादने सिदगोडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रसाद यांनी मुलीची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


नर्सिंग होमच्या कृतीवर संशय
अविनाश प्रसाद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये पत्नी संगीता यांनी सिदगोडा इथं असलेल्या नर्सिंग होमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. पण नर्सिंग होममधल्या डॉक्टरांनी जन्म झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. प्रसाद यांनी मुलीचा मृतदेह देण्याची विनंती केली, पण नर्सिंग होमने त्यांना मुलीचा मृतदेह देण्यास नकार दिला. थातुरमातूर कारण देत नर्सिंग होममधल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसाद यांना मुलाला घेऊन जाण्यास सांगितलं. 


नर्सिंग होममधल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलीची विक्री केल्याचा आरोप आता प्रसाद यांनी केला आहे. आमची मुलगी आम्हाला परत हवी आहे अशी मागणी प्रसात दाम्पत्याने केलीय.